Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी! ९ जागांसाठी चुरस

- जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार


मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५ जागा, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे ही समीकरणे बदलण्याची शक्यता असून निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.


दरम्यान, भाजपकडे ५ उमेदवार सहज निवडून येण्याइतके संख्याबळ असले तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.



या उमेदवारांचा कार्यकाळ संपणार:



  • उद्धव ठाकरे

  • नीलम गोर्हे

  • शशिकांत शिंदे

  • अमोल मिटकरी

  • गोपीचंद पडळकर

  • रणजितसिंह मोहिते-पाटील

  • राजेश राठोड

  • प्रवीण दटके

  • रमेश कराड


विधान परिषदेसाठी एका उमेदवाराला विजयासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजप (१३१), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४०) असे मिळून मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचे ८ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना सुमारे १० अतिरिक्त मतांची गरज भासणार असून सध्याच्या परिस्थितीत ते आव्हानात्मक ठरत आहे.



भाजपकडून या नावांची चर्चा :


केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुते यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच पक्षाचे काही विद्यमान आमदार निवृत्त होत असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


एकूणच, येणारी विधान परिषद निवडणूक ही केवळ आकड्यांची नव्हे तर प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर