मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, वातावरणचा समतोल बिघडत असल्याने याचा थेट परिणाम जीवसृष्टी वर होताना पाहायला मिळत आहे. कडकी उन्हात उष्माघाताने बळी जात आहेत. तर कुठे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होताना पाहायला मिळत आहे.
अशातच १९ एप्रिल रोजी महाराष्टात दुहेरीस संकट उध्दभवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देखील जरी करण्यात आले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रावर संकट
विदर्भात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार
अकोला अमरावती, वर्ष या भागात येत्या काही दिवसात वातावरणात उष्णता पतचंद वाढणार असून नागरिकांनी नियोजन करूनच घराबाहेर पडावे, दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी योग्य य्त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पाऊस आणि वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.






