- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल असोसिएशन (एम एफ ए) फर्स्ट डिव्हिजन चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात तिवाना फुटबॉल क्लबने मुंबई युनाइटेड एफसीचा १-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. (Tiwana Football Club)
वांद्रे पूर्व येथील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर खेळल्या गेलेल्या या अटीतटीच्या सामन्यात तिवाना फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना, शिस्त आणि झुंजार वृत्तीचे प्रदर्शन केले. टीमने निर्णायक गोल नोंदवत शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली आणि प्रतिष्ठित मुंबई फुटबॉल असोसिएशन (एम एफ ए) फर्स्ट डिव्हिजन चषक २०२६ आपल्या नावावर केली. (Tiwana Football Club)
हा विजय तिवाना फुटबॉल क्लबसाठी अत्यंत विशेष आहे, कारण मागील वर्षी टीमने मुंबई फुटबॉल असोसिएशन सेकंड डिव्हिजनच्या फायनलमध्ये शानदार विजय मिळवून विजेतेपद पटकावले होते. सलग दुसऱ्या वर्षी फायनल जिंकून टीमने आपल्या विजयी प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. (Tiwana Football Club)
- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११ टक्के नमुने दूषित मुंबई (सचिन धानजी) : ...
या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना प्रशिक्षक रितेश पेरांब्रा म्हणाले की "हा विजय खेळाडूंचे अथक परिश्रम आणि शिस्तीचे फळ आहे. मी विशेषतः तेजिंदरसिंग तिवाना यांचे आभार मानतो, ज्यांनी मुंबईच्या उपनगरातील होतकरू आणि गुणवंत तरुणांना एक उत्तम व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या याच व्हिजन आणि पाठिंब्यामुळे आज आपल्या होतकरू खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची आणि मोठ्या स्तरावर पुढे जाण्याची सुवर्णसंधी मिळत आहे." (Tiwana Football Club)
गेल्या वर्षी सेकंड डिव्हिजनमध्ये चॅम्पियन बनल्यानंतर फर्स्ट डिव्हिजनमध्येही विजेतेपद पटकावणे हे तिवाना फुटबॉल क्लबच्या खेळाडूंची मेहनत, समर्पण आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक आहे. संघाने पुन्हा एकदा जिंकण्याची जिद्द, मजबूत इरादे आणि विजयी मानसिकतेचा परिचय दिला आहे. या शानदार यशामागे टीम मेंटॉर रॉनी डि'सूजा सर ( यूके फुटबॉल अकॅडमी ), प्रशिक्षक रितेश पेरांब्रा, व्यवस्थापक तहावेश शेख आणि सहाय्यक प्रशिक्षक अवी यांचे निरंतर मार्गदर्शन, विश्वास आणि अथक परिश्रमांचा मोलाचा वाटा राहिला आहे. (Tiwana Football Club)
संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या जुन्या नारळाच्या झाडांवरून नारळ पडून ...
तिवाना फुटबॉल क्लबच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल संपूर्ण संघ, कोचिंग स्टाफ आणि सर्व समर्थकांचे हार्दिक अभिनंदन. सेकंड डिव्हिजनपासून फर्स्ट डिव्हिजनपर्यंतचा हा प्रवास संघासाठी अभिमानास्पद असून मुंबई फुटबॉलमध्ये तिवाना फुटबॉल क्लबने मानाचे स्थान मिळवले आहे. (Tiwana Football Club)






