Bihar Politics : नारी शक्ती अधिनियमाला विरोध करणाऱ्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य, महिलांचे राजकीय करिअर बेडपासून...

बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि त्यांच्या वर्तनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा संपूर्ण देशातून विरोध केला जात आहे. याप्रकरणी बिहार राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली असून आयोगाने खासदाराकडून त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण मागवले आहे.



जाणून घ्या नेमकं प्रकरण :


बिहारचे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी राजकारणात कार्यरत असलेल्या महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांनी असा दावा केला आहे की, तडजोडीशिवाय देशाच्या राजकारणात महिलांना पुढे जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे आणि त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेतले जात नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, भारतीय समाजात महिलांना देवी मानले जात असले तरी, वास्तव याच्या अगदी उलट आहे.


पप्पू यादव यांच्या मते, राजकारणातील बहुतेक महिला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रभावशाली लोकांच्या वैयक्तिक वर्तुळातून करतात. त्यांनी असा आरोप केला की, सत्तेच्या वर्तुळात महिलांचे शोषण खोलवर रुजलेले आहे. पप्पू यादव म्हणाले की, कटू सत्य हे आहे की ९०% महिलांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजकारण्यांच्या बिछान्यातूनच होते. एखाद्या प्रभावशाली नेत्याच्या खोलीत प्रवेश केल्याशिवाय महिला राजकारणात येऊ शकत नाहीत.



या प्रकरणाची स्वतः दखल घेऊन, बिहार राज्य महिला आयोगाने खासदार पप्पू यादव यांना त्यांच्या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना तीन दिवसांच्या आत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.



मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात :


पुढे बोलताना पप्पू यादव यांनी राजकारण्यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, संसद आणि राज्य विधानसभांमधील अनेक प्रतिनिधी महिलांना आदराने वागवत नाहीत. ते असेही म्हणाले की, मोठ्या संख्येने राजकारणी अश्लील गोष्टी पाहतात आणि याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनची तपासणी केली पाहिजे.



नारी शक्ती वंदन कायदा म्हणजे फक्त एक राजकीय खेळी :


पप्पू यादव यांनी महिला आरक्षणाबाबतच्या केंद्र सरकारच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आहे. त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याला केवळ एक राजकीय खेळी म्हटले आणि सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा कायदा आधी का आणला नाही, असा प्रश्न विचारला. त्यांच्या मते, या कायद्यात मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतुदींचा समावेश असलाच पाहिजे, अन्यथा त्याचे फायदे केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित राहतील.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि