Fighter Jets Landing : एक्सप्रेस वे वर उतरली लढाऊ विमानं, भारताच्या हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन

सुलतानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर भारताची लढाऊ विमानं एकामागून एक या पद्धतीने उतरली. नंतर या विमानांनी तिथून विमानतळाच्या दिशेने परत उड्डाण केले. हा प्रयोग करून आणीबाणीच्या प्रसंगी लढाऊ विमानं विमानतळाव्यतिरिक्त एक्सप्रेस वे वर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवणे शक्य आहे याची चाचपणी करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला. या निमित्ताने उपस्थितांना भारताच्या हवाई दलाचं सामर्थ्य बघण्याची संधी मिळाली. हवाई दलाची ताकद बघण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे जवळ स्थानिकांनी तुफान गर्दी केली होती. एक्सप्रेस वे वर होणारे लँडिंग आणि तिथून थोड्या वेळाने होणारे टेक ऑफ हे बघून उपस्थितांनी वारंवार टाळ्यांचा कडकडाट केला. भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.


एक्सप्रेस वे वर चाचणीसाठी तीन तात्पुरत्या धावपट्ट्या तयार केल्या होत्या. या धावपट्ट्यांचा वापर हवाई दलाने प्रयोगासाठी केला. पूर्वांचल एक्सप्रेस वे तयार झाल्यापासून तिसऱ्यांदा हवाई दलाने यशस्वी प्रयोग केला आहे. यावेळी सुखोई, मिराज, जॅग्वार, LCA तेजस या विमानांनी पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील तात्पुरत्या धावपट्ट्यांचा वापर केला. नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वर एमआय १७ हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. सी २९५ आणि एएन ३२ ही दोन मालवाहक विमानंही पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उतरवण्यात आली. या सर्व विमानांनी लँडिंग नंतर पूर्वांचल एक्सप्रेस वे वरून टेक ऑफचाही यशस्वी प्रयोग केला.


युद्धकाळात शत्रूच्या हल्ल्यात विमानतळाचे नुकसान झाले तर एक्सप्रेस वे चा वापर करून विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग करता आले तर हवाई दलाला विमानतळ दुरुस्त करण्यास वेळ मिळतो आणि शत्रू विरोधातील हवाई कारवाया थांबत नाहीत. यामुळे पूर्वांचल एक्सप्रेस वे वरील चाचणी लष्करीदृष्ट्या महत्त्वाची होती. ही चाचणी तब्बल तीन वेळा यशस्वी झाल्यामुळे हवाई दलात आनंदाचे वातावरण आहे. शत्रूच्या चिंतेत भर पडली आहे.


केंद्र सरकार विमानतळाव्यतिरिक्त वापरण्यासाठी देशात २० एक्सप्रेस वे सज्ज करत आहे. या नियोजनाचा भाग म्हणूनच पूर्वांचल एक्सप्रेस वे वर लँडिंग आणि टेक ऑफची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीला टच अँड गो टेस्ट असेही म्हणतात. ही टेस्ट यशस्वी झाल्यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. आणखी काही काळ या चाचण्या सुरू राहणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस वे चा ठराविक भाग पुढील कही दिवस अधूनमधून चाचणीसाठी वापरला जाणार आहे. यामुळे एक्सप्रेस वे च्या ठराविक भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ही व्यवस्था २ मे पर्यंत असेल. या व्यवस्थेत काही बदल करण्याचा निर्णय झाल्यास प्रशासन त्याची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे देईल, असेही सांगण्यात आले आहे.


पंतप्रधान मोदींनी पूर्वांचल एक्सप्रेस वे चे उद्घाटन २०२१ मध्ये केले . उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत तिसऱ्यांदा हवाई दलाने प्रयोग करण्यासाठी पूर्वांचल एक्सप्रेस वे चा प्रभावी आणि यशस्वी वापर केला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि