लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना अनेक लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते, त्यामुळे त्यांना मिळणारा लाभ हा बंद झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत.


लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत दिली होती. त्यानंतर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ देत याबाबत माहिती दिली होती.


लाडकी बहीण योजना
विधानसभा निवडणुकीआधी सरकारकरने लाडकी बहीण योजना ( Ladki Bahin Yojana) सुरु केली होती. ज्या माध्यमातून गरजू महिलांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये निधी जमा करण्यात येतो. या योजनेचा अनेक महिलांना लाभ होत आहे. तर ई-केवायसी (eKYC) च्या अडचणीमुळे अनेक गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यामुळे ई-केवायसी (eKYC) साठी मुदतवाढ उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्याचे फक्त शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्यासाठी 31 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख आहे.


लाडकी बहीण योजनेसाठी अटी (Ladki Bahin Yojana Eliibility Criteria)
लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा अडीच कोटी महिलांनी अर्ज घेतला होता. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला होता. अनेक महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नव्हत्या. अनेक महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते त्यांचा लाभ बंद केला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत. एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात.


बोगस लाडक्या बहिणी आणि भाऊ
लाडकी बहीण योजनेत अनेक टॅक्स भरणाऱ्या बड्या लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय काही पुरुषांनी तर कागदोपत्री महिला असल्याचं दाखवत योजनेचा गैरफायदा घेतला होता. राज्यात लाडक्या नसलेल्या या 12 हजार 757 पुरुषांनी सरकारला 22.96 कोटी रुपयांचा लाभ घेतला होता. श्रीमंत बहिणींकडून वसुलीसाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पत्र पाठवून 50 टक्के वसुली सुद्धा केली आहे.


फक्त आणि फक्त अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठीच असलेल्या या योजनेत भल्याभल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलं. या चुकीच्या प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी ई-केवायसीची संकल्पना अंमलात आणली गेली, आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट-आऊट करण्याची योजना आखली.


अशी करा केवायसी
लाडक्या बहि‍णींनी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. यासाठी वेबसाइटवर पर्याय देण्यात आला आहे. यावेळी योग्य पर्याय निवडून त्यावर जाऊन तुम्हाला आधार आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करायचं आहे. यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. महिलांनी केवायसी केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतरच पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा