लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य सुखकर होतं. पण जोडीदार निवडताना निर्णय चुकला तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही. लग्नाच्या आधी केलेले काही कृत्य लग्नाच्या वेळेस होणाऱ्या जोडीदारासोबत लपवून ठेवले जातात. पण हेच जर लग्नाच्या नंतर किंवा एन लग्नाच्या वेळेस समोर आले तर सर्वांनाच मोठ्या अडचणीत आणणारे ठरते. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्य (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये घडली आहे. जिथे लग्नाला अवघे 10 दिवस उरलेले असताना अचानक असा फोन आला की वरपक्षाचे धाबे दणाणले आहे.


नेमके प्रकरण काय ?


“तू तिच्याशी लग्न केलस तर संपवून टाकेन. ती माझी आहे.आमच्यात प्रेमसंबंध आहेत” असं फोनवरून थेट नवरदेवाला सांगण्यात आले. त्यांच्यात काय नातं आहे, याचे पुरावे देखील त्या फोन करणाऱ्याने पाठवले. लग्नघरी सनईचे सूर घुमत होते. लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. मिठाईवाल्यापासून ते मंडपवाल्यापर्यंत सर्वांची बुकिंग झाली होती. पण ऐनवेळी एक फोन कॉल आला आणि आनंद क्षणात दु:खात बदलून गेला.


जबलपूरच्या अजित यादवचं लग्न बरेलाच्या महक यादव बरोबर ठरलेलं. 20 एप्रिल 2026 रोजी लग्न होतं. आपल्या ऐपतीपेक्षा अजितच्या कुटुंबाने जास्त खर्च केलेला. दीड ते दोन लाख रुपये मंडप, बँड-बाजा, जेवण, बस बुकिंग यासाठी खर्च केलेले. 10 एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास अजितच्या मोबाइलवर एक फोन आला आणि डोळ्यात साठवलेली सर्व स्वप्न क्षणात मोडली.


फोन करणाऱ्याने त्याचं नाव सचिन विश्वकर्मा सांगितलं. महक माझी प्रेयसी आहे. आमचा एकमेकांवर प्रेम आहे. त्याने काही फोटो आणि वॉइस रेकॉर्डिंग पाठवली. त्यानंतर अजितच्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्यात शरीरसंबंध आहेत. एकदा गर्भपातही केलाय असा दावा सचिनने केला. अजितने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला आणि महकच्या घरच्यांना सांगितली. तेव्हा एकच गोंधळ उडाला.


पंचायत बोलवण्यात आली. महकला विचारलं, तेव्हा तिने सचिन मित्र असल्याचं सांगितलं. लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं बंद करणार नाही असं ती म्हणाली. अजितच्या कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. त्यावरुन लग्न मोडलं. महकच्या कुटुंबाने लग्नाचे पैसे देण्याची तयारी दाखवली. पण नंतर माढोताला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अजित आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला, तशी तक्रार दिली. अजितचं म्हणणं आहे की त्यालाच आता खोट्या प्रकरणात फसवलं जातय. यासाठी त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ आली.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि