IMD Guidelines on Heatwave : आयएमडीतर्फे उष्णतेच्या लाटेबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी

- पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता


मुंबई : देशाच्या अनेक भागांमध्ये सतत वाढणारे तापमान आणि सरासरीपेक्षा जास्त उष्ण हवामान पाहता, पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी केल्या आहेत.


ताज्या अध्ययनानुसार, वायव्य, मध्य आणि द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांत कमाल तापमान सध्या 40°C ते 44°C च्या दरम्यान असून, श्री गंगानगर (राजस्थान) येथे सर्वाधिक 44.5°C तापमानाची नोंद झाली आहे. अनेक प्रदेशांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा 5°C किंवा त्याहून अधिक वाढीची नोंद झाली आहे. ही बाब, देशाच्या काही भागांमध्ये उष्णतेची काहिली वाढल्याची निदर्शक आहे.


येत्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगढ आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मध्य भारताच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. त्याच वेळी, किनारपट्टी आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर भारताच्या काही भागांत रात्रीचे तापमान अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे जीवाची काहिली आणि आरोग्यविषयक तक्रारी जाणवण्याचा धोका वाढू शकतो.


वायव्य भारतात 27 एप्रिल पर्यंत कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. तर मध्य आणि इतर भागांमध्ये या काळात तापमानात सुरुवातीला वाढ आणि त्यानंतर घट दिसून येऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


एकंदर परिस्थिती लक्षात घेता, उष्णतेच्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळणे, विशेषतः दुपारच्या वेळी पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सुती कपडे घालणे आणि उच्च तापमानाच्या काळात घराबाहेरील कष्टाची कामे टाळणे यांचा समावेश आहे. लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


उष्णतेशी संबंधित आजार, जसे की उष्णतेमुळे येणारा थकवा आणि उष्माघाताचा धोका कमी करण्यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर भारतीय हवामान विभागाने भर दिला आहे. आयएमडी च्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.


विशेषतः खालील भागांमध्ये ही स्थिती असेल: वायव्य भारत (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश); मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ); दक्षिणेकडील निवडक प्रदेश (केरळ आणि माहे) याव्यतिरिक्त, ओदिशा, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्ण वातावरण कायम राहू शकते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जाणवणारा उष्म्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.


भारतीय हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 दरम्यान पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांत, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे; यामुळे सध्या सुरू असलेल्या उष्ण हवामानाच्या वातावरणात, नियमित खबरदारी घेण्यासह उपाययोजनांची आवश्यकता प्रामुख्याने आहे.



भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेबाबतची सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे अधिकृत संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/responsive/heatwave_guidance.php) जनतेच्या माहितीसाठी आणि प्रसारासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये, काय करावे आणि काय करू नये, पूर्वतयारीच्या उपाययोजना आणि विविध क्षेत्रांसाठीच्या विशेष सूचनांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि स्थानिक प्रशासनांना आरोग्याशी संबंधित धोके कमी करण्यात आणि उष्णतेच्या तीव्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढवण्यात मदत करणे हा आहे.


भारतीय हवामान विभाग तापमानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळीच हवामानाचे अंदाज व इशारे जारी करत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकृत स्रोतांद्वारे अद्ययावत राहण्याचा आणि दिलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि