Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत हरीगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरीजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.



मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामे करण्यात येत आहेत. या कामांना अधिक गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथील विकास कामाच्या अनुषंगाने येथील सर्व आखाड्यांच्या महंतांशी लवकरच चर्चा करणार असून त्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा