Monsoon 2026 : आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार

- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज


एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक वार्ता आहे. नवीन संकेतानुसार मान्सून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मे अखेरीस डेरेदाखल होण्याची सुखद वार्ता मिळत आहे. युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राने (ECMWF) नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, मान्सून अगोदर अंदमान-निकोबार बेटावर धडकेल. येत्या १८ ते २५ मे या कालावधीत पावसाचे आगमन होईल. एकीकडे महाराष्ट्रातच नव्हे, देशाच्या अनेक भागांत तापमान ४०-४४ डिग्रीपर्यंत पोहचले आहे. उत्तर, मध्य आणि पूर्वोत्तर भारत उष्णतेच्या लाटेत होरपळला आहे. तर अल-निनोमुळे यंदा मान्सून लांबण्याचा आणि पाऊस उशिरा येण्याचा दावा करण्यात येत होता. परिणामी शेतकऱ्यांसह सरकारही चिंतेत आले होते.


मात्र युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने म्हटले आहे की, गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाला होता. यावर्षीही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मे महिन्याच्या मध्यात अथवा अखेरीस अंदमान-निकोबार बेटासह दक्षिण भारतात पाऊस हजेरी लावेल. या पट्ट्यात ३० ते ६० मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २५ मे ते १ जून या दरम्यान केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण टप्प्यात पावसाचे आगमन होईल. यामुळे शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. तर गरमी, उष्णतेने हवालदिल झालेल्या नागरिकांसह पशूपक्ष्यांना आणि प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल.



हवामान तज्ज्ञानुसार, सध्याचे सर्व हवामानाचे संकेत हे बंगालच्या खाडीत आणि अंदमानच्या समुद्रावरून दक्षिण-पश्चिम दिशेने वेगवान वारे दर्शवत आहेत. हेच वारे समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते. या थंडगार वाऱ्यामुळे पावसाची शक्यता वाढते. याशिवाय अंदमानच्या उत्तर पट्ट्यात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून अवघ्या २० दिवसात भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.


हवामान तज्ज्ञ देवेंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन अधिक लवकर होईल. तर अल निनोची (El Nino) कोणतीही भीती नसेल. मान्सूनसाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे. तर इंडियन ओशन डायपोलची (IOD) भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे. यामध्ये हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील समुद्राचे तापमान ठरते. या तापमानात अंतर असते. मान्सूनसाठी आयओडी अनुकूल मानल्या जात आहेत. सध्या उष्णतेने जमीन तापली आहे. कडक उन्हामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे मानले जात आहे. अजून १५ दिवस कडक उन्हामुळे मान्सूनसाठी चांगले वातावरण असेल, असा दावा करण्यात येत आहे.



दरम्यान महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमान वाढले आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून, भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा