Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर इतकं टोकाला पोहोचलं की पत्नीने कुटूंब उद्ध्वस्त करणारा निर्णय घेतला. नॉनव्हेज जेवणावरून सुरु झालेला वाद थेट पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.


नेमकं प्रकरण काय ?


तेलंगणातील कामारेड्डी परिसरातील (Kamareddy) वाम्बे कॉलनीत कोदंडा शिवाजी नामक व्यक्ती राहत होता. कोदंडा शिवाजी दिहाडीवर काम करणारा मजूर होता. तो आपल्या पत्नी लक्ष्मी आणि दोन लहान मुलींसोबत येथील भाड्याच्या घरात राहत होता. त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. रोजच्या मजुरीवरच कुटुंबाचा गाडा चालत होता. त्याच्या मोठ्या मुलीचं वय दोन वर्षे तर लहान मुलीचं वय एक वर्ष इतकं आहे.


या जोडप्याचं जेवण बनवण्याच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री वाद झाला. माहितीनुसार, जेवणात चिकन न बनवल्याने शिवाजी नाराज झाला होता. त्यातच घरच्या आर्थिक अडचणींमुळे तो काहीसा नैराश्यात होता. या दोन्ही गोष्टींमुळे पती-पत्नीमधील वाद अधिकच चिघळला.हा किरकोळ सुरू झालेला वाद काही क्षणांतच गंभीर झाला. आरोपानुसार, संतापाच्या भरात लक्ष्मीने घरात असलेल्या धारदार हत्याराने शिवाजीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर गंभीर जखम झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ( Crime News )


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ( Telangana Crime News ) आरोपी पत्नी लक्ष्मीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामारेड्डी पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे एका रात्रीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालंय. प्राथमिक तपासात हा खून कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास कर आहेत.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि