पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने आणि एअर डिफेन्सच्या नारी शक्तीने चांगलाच दणका दिला होता. भारताच्या S-400 समोर पाकिस्तानची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अगदी निष्प्रभ ठरले होते. अशातच आता याच S-400 डिफेन्स सिस्टमबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


भारताला रशियाची पुन्हा साथ मिळाली असून रशियाकडून आता काही दिवसांत S-400 ची नवी खेप मिळणार आहे. रशियाने भारतासाठी चौथी S-400 एअर डिफेन्स सिस्टम रवाना केली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली तैनात होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताची सुरक्षा आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. ही नवीन S-400 प्रणाली राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे.


एका वृत्तानुसार रशियाने चौथी S-400 प्रणाली भारताकडे पाठवली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही सिस्टम भारतीय बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर पाचवी S-400 प्रणाली यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान याच S-400 ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिच्यासमोर शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्या सर्व योजना फसल्या होत्या. आता आणखी प्रणाली भारतात दाखल होत असल्याने भारताची ताकद आणखी वाढली आहे.


मोदी सरकारने आधीच आणखी पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यास मंजुरी दिलेली आहे. या प्रणालींमध्ये पाकिस्तानमधील कोणतेही हवाई लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. याची मारक क्षमता सुमारे 400 किलोमीटरपर्यंत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारताने 2018 मध्ये रशियासोबत पाच S-400 लाँग-रेंज सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टमसाठी 5.5 अब्ज डॉलरचा करार केला होता. सध्या भारताकडे तीन S-400 प्रणाली कार्यरत आहेत. उर्वरित लवकरच भारतात दाखल होणार आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी