Preet Singh : मुंबईत 'या' अभिनेत्रीला जबर मारहाण; डोळे सुजले, दात पाडले

मुंबई : मुंबईत एका अभिनेत्रीला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अभिनेत्रोचे डोळे सुजले तसेच दात पडले असून चेहऱ्यावर गंभीर जखमा देखील झाल्या आहेत, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती दिली आहे.



ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण?


टीव्हीवर सुरू असलेल्या 'एमटीव्ही स्पिल्टव्हिला' १६ मधील ती स्पर्धक आहे. प्रित सिंग असं तिचं नाव आहे. हल्ल्यात प्रीतच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळल्यापासून तिचे फॅन्स संतापले आहेत.




प्रीतला मारहाण नक्की झाली कशी ?


प्रीतने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय की ती तिच्या मैत्रिणीसोबत मुंबईत एका क्लबमध्ये गेली होती. अचानक तिथे असलेल्या एका मुलीने ओरडायला सुरुवात केली की यांना आत प्रवेश कसा मिळाला? याच रूपांतर मारामारीत झालं. त्या मुलीच्या पुरुष मित्राने आमच्यावर हल्ला केला. इतक्या जोरात फटका मारल आहे त्यात माझा दात तुटला असून चेहरा देखील सुजला आहे.



मारहाण कोणी केली?


ती मुलगी एक इन्फ्लुएन्सर असून प्रीतने तिचा उल्लेख 'सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर' असा केला आहे.उपस्थितांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. नाहीतर आणखी हल्ला होण्याचा धोका होता, असे प्रीत म्हणाली. 'मुंबई ही मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर आहे असं मी ऐकलं होत. तिथे मला असा अनुभव येईल असे मला वाटलं नव्हते' असे प्रीतने पोस्ट मध्ये म्हटले आहे.




प्रीत सिंगला मित्रांकडून पाठिंबा


प्रीतच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी चिंता व्यक्त केलीय असून अनेक कलाकारांनी तिला पाठिंबा देत कारवाईची मागणी केली आहे.


Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी