Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या आणि पवार कुटुंब राजकारणामुळे विभक्त होण्याच्या चर्चा रंगू लागल्या, पण त्या चर्चांना पूर्णविराम देत आज शरद पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे.



पवार कुटुंबाच्या भेटीचे कारण काय ?


या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी कुटुंबातील सर्व सदस्य या स्नेहभोजनसाठी हजर राहणार आहेत. शरद पवार सध्या पुण्यातील मोदीबागमध्ये वास्तव्यास आहेत. या ठिकाणी पवार कुटुंब एकत्र भेटणार आहेत. कौटुंबिक आणि राजकारणातील अनेक घडामोडी सध्या पवार कुटुंबात घडत आहेत. रेवती सुळेचं लग्न शिवाय रोहित पवार, जय पवार यांची आगामी निवडणुकांविषयी वक्तव्य या पार्श्वभूमीवर हे स्नेहभोजन होत आहे.




सुनेत्रा पवार आणि जय, पार्थ पवार राहणार उपस्थित ?


'पवार विरुद्ध पवार' अशा संघर्षांला तोंड फुटत असताना पवार कुटुंबीयांची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. सायंकाळी ५ वाजता मोदीबागेत पवार कुटुंब हजर राहणार असून, सुनेत्रा पवार सध्या मुंबईत आहेत, सुनेत्रा पवार जाणार की नाही?याकडे सर्वांच्या नजरा आहेत. जय पवार बाहेर असल्याने या कार्यक्रमाला अनुउपस्थित राहू शकतात अशा चर्चा आहेत.




कौटुंबिक की राजकीय भेट ?


मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी बोलावलेली ही भेट कौटुंबिक असून कोणताही राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या या स्नेहभोजनाला कोण उपस्थित राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी