क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं सर्रास पहायला मिळतात. एकूणच काय तर क्रिकेटचं मैदान म्हटल्यावर राडा तर होणारच. नाही का ? पण राडा तितकाच मर्यादित राहिला तर ठीक नाही तर रक्ताचा सडा मैदानात पडायला वेळ लागत नाही. आणि हेच जळगावमध्ये घडलं. (Jalgoan Cricket Crime News)


जळगावच्या प्रसिद्ध मेहरुण तलाव परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. क्रिकेटच्या मॅचनंतर हा वाद झाला आणि वादाचं पुढे तुफान हाणामारीत रूपांतर झालं. या भांडणात धारदार शस्त्रांनी एकमेकावर वार केल्यानं तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


'तो' प्रश्न अन वादाची ठिणगी पेटली
क्रिकेट सामना संपल्यानंतर किरकोळ कारणावरून मेहरूण तलाव परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले. तुम्ही कुठले? या प्रश्नावरून वादाची ठिणगी पडली अन् प्रकरण पेटलं. हाणामारीदरम्यान दोन्ही गटांनी धारदार शस्त्रांचा वापर केला. चॉपरसारख्या शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये राहुल सोनवणे, चेतन सोनवणे आणि मोहीत महाजन यांचा समावेश आहे. (Jalgoan Cricket Crime News)


दोन तरुण एकमेकांच्या जवळ रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जखमींना प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल सोनवणे याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विक्रांत राणे, मोहीत महाजन व निलेश सपकाळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


पोलिसांच्या ताब्यात असलेला मोहीत महाजन जखमी असतानाही त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, असा आरोप करण्यात आलाय. गंभीर जखमी असतानाही मोहितला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना मोहीतची प्रकृती अचानक खालावली. (Cricket Crime News )


मोहितला सायंकाळी अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागलं. त्यानंतर उलटी होऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर मोहितला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मोहितला रुग्णालयात नेल्यावर छातीमध्ये चॉपरने वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी असल्याचं कळालं. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा