गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे महिलांना धुरापासून मुक्ती मिळून सुरक्षित आणि स्वच्छ इंधनाचा वापर करता येतो. आतापर्यंत देशभरात १० कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील महिलांना मोफत गॅस कनेक्शन, सिलेंडर आणि गॅस शेगडी दिली जाते. २०१६ पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे लाखो महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंपाकासाठी सुरक्षित आणि परवडणारे इंधन उपलब्ध करून देणे. यामुळे महिलांचे आरोग्य सुधारते तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येते.


प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्जदार महिला किमान १८ वर्षांची असावी, संबंधित महिलेकडे यापूर्वी गॅस कनेक्शन नसावे, लाभार्थी बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबातील असावा, महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असावी,भारत गॅस,इंडियन गॅस किंवा एचपी गॅस यापैकी कोणत्याही कंपनीची निवड करता येते. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. जसे की,
जात प्रमाणपत्र
बीपीएल रेशनकार्ड
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा (उत्पन्न दाखल्यासह)
पासपोर्ट आकाराचा फोटो


अर्ज कसा कराल?
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावर योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध असून, ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येते.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि