Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि मृताची पत्नी सोनम रघुवंशीला तब्बल ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मेघालय पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, एका गंभीर चुकामुळे संपूर्ण प्रकरण कमकुवत झाल्याची बाब समोर आली आहे. सोनमच्या चौथ्या सुनावणीत न्यायालयाने भूमिका बदलत अटकेच्या कागदपत्रांतील त्रुटी लक्षात घेत सोनमला जामीन मंजूर केलाय. न्यायालयाने तिला पुरावे व साक्षीदारांपासून दूर राहण्याचे तसेच शिलॉन्ग सोडू नये, अशी अट घातली आहे. (Raja Raghuvanshi Case )


अटक मेमोमध्ये चुकीचे कलम


एवढ्या मोठ्या प्रकरणात आणि ७९० पानी आरोपपत्र दाखल असतानाही सोनम रघुवंशीला जामीन मंजूर झाल्याने राजा रघुवंशीच्या कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात मोठी चूक म्हणजे अटक मेमोमध्ये चुकीचे कलम लावण्यात आले. हत्या प्रकरणात बीएनएस कलम 103(1) लावणे अपेक्षित असताना, पोलिसांनी चुकून कलम 403(1) लागू केले, जे संपत्तीचा गैरवापर यासंदर्भात आहे.


या गंभीर त्रुटीमुळे अटकेची कारणे स्पष्ट न दिल्याचे मानले गेले आणि आरोपीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे जामीन मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच, २ जून २०२५ रोजी गाझीपूर न्यायालयात सोनमला हजर करताना तिच्याकडे वकील कोण होता, याची माहिती पोलिसांकडे नव्हती. तिला कायदेशीर मदत मिळाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने यालाही अधिकारांचे उल्लंघन मानले. पोलिसांनी ही चूक केवळ लिपिकीय असल्याचे सांगितले, मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. (Sonam Raghuvanshi)


दरम्यान, ११ महिने कारावास आणि सुनावणीतील विलंब याचाही फायदा सोनमला झाला. तिच्या वकिलांनी अटक मेमो, इतर कागदपत्रे आणि केस डायरीतही चुकीची कलमे नमूद असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे जामीन मिळण्यास मदत झाली. या निर्णयानंतर इतर आरोपींनाही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर तिला जामीन देण्यात आला असून, सोनमचे वडील देवी सिंह यांनी तो भरला. मात्र, जामीन मिळूनही सोनमला शिलॉन्गबाहेर जाण्यास मनाई आहे. इंदौरमध्ये या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असून, मृत राजा रघुवंशीच्या भावाने हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. तर त्यांची आई या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करत आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि