Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला. पर्यटकांनी भरलेली नर्मदा क्रूझ नौका खमरिया टापूजवळ असंतुलित होऊन बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर आजींची १०-१२ जण बेपत्ता आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेला बरगी बांध नर्मदा नदीवर बांधलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बांध सिंचन, ९० मेगावॅट वीज निर्मिती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे बोटिंग आणि क्रूझ सफरीसाठी दररोज पर्यटक येतात. याठिकाणी गुरुवारी, संध्याकाळी ५.३० वाजता क्रूझ पर्यटकांना घेऊन नर्मदा नदीवरील बरगी धरणात फिरत होती. अचानक हवामान बिघडले आणि जोरदार वारे सुटल्याने क्रूझमध्ये पाणी शिरू लागले. काही क्षणांतच बोट नियंत्रणाबाहेर जाऊन बुडाली.



प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसले. परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, तरीही शोधमोहीम सुरूच आहे.प्राथमिक माहितीनुसार, क्रूझमध्ये कॅप्टनसह सुमारे ३०-३५ लोक होते. बचाव पथकाने 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले असून क्रूझ कॅप्टन महेश पटेल यांनाही नंतर वाचवण्यात आले.





मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक :


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.सरकारने जाहीर केले आहे की, बचावकार्याला पूर्ण गती देण्यात आली असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा