मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा दरवर्षी घेण्यात येते आणि यंदाच्या परीक्षेचा अखेर आज निकाल लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत १२ वीच्या निकालाबाबत माहिती दिली. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्याचा निकाल ८९.७९टक्के लागला आहे, तर कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांनी अव्वल स्थानावर आहे. तर लातूर विभागाचा निकाल तुलनेत कमी म्हणजे 84.14 टक्के इतका आहे.
पत्रकार परिषदेत दिली माहिती
यावर्षीच्या निकालाचा टक्का का घसरला?
निकाल घटण्यामागचे मुख्य कारण म्हणजे यावरही कॉपीमुक्त अभियान हे चांगल्या प्रक्रारे राबवले गेले असून गेल्या वर्षी एकही कर्मचाऱ्यावरती कारवाई केली जात नव्हती तर यावेळी तस न करता १०० जणांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ९१.८८ निकाल होता तो यावर्षी २.० टक्क्याने घसरला आहे. सरकार तसेच बोर्डाकडून राबवल्या गेलेल्या या अभिनयामुळे टक्का जरी घसरला असला तरी कारवाई आणि कॉपी करण्याचे प्रमाण देखील घसरले आहे.
यावर्षी सुद्धा मुलींनीच मारली बाजी
यंदा टक्केवारी घसरली असली तरी, १२ विच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्व विभंगोय मंडळातून ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ८६.८० टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहे.
२०२२ पासून घटणारा निकाल
२०२२ - ९४.२२ %
२०२३ - ९३. ७३ निकाल ०.४९% घसरला
२०२४ - ९३.३७ % निकाल ०.६६ % घसरला
२०२५ - ९१.८८% निकाल १.४९%
२०२६ - ८९.७९% निकाल २.०९%






