West Bengal Election 2026 : ईव्हीएम वाद पेटला! बंगालमध्ये १५ केंद्रांवर फेरमतदान सुरू; टेप लावून बटणे झाकल्याचा आरोप

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील एकूण १५ मतदान केंद्रांवर आज (शनिवार, २ मे) सकाळी ७ वाजल्यापासून फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानावेळी गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.


मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप अनेकांकडून होत होता. या आरोपांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित केंद्रांवरील मतदान रद्द करून फेरमतदानाचा निर्णय घेतला.


सर्वात मोठा वाद फाल्टा विधानसभा मतदारसंघात उभा राहिला. येथे एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवरील कमळ चिन्ह (भाजप) तसेच सीपीएम उमेदवाराच्या नावासमोरील बटण टेप लावून झाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. फाल्टा येथील आणखी ३० केंद्रांवर फेरमतदान घ्यायचे की नाही, याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.



२९ एप्रिल रोजी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ आणि वाद निर्माण झाले होते. मतदारांना उमेदवारांची नावे दिसू नयेत म्हणून जाणीवपूर्वक बटणे झाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम ५८(२) अंतर्गत मतदान रद्द करण्याचा अधिकार वापरला आहे.



दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, ज्या ठिकाणी अनियमितता सिद्ध होईल, तेथे फेरमतदान घेतले जाईल. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही गडबड सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.


या संपूर्ण प्रकरणामुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले असून, आगामी निकालांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि