India-Cambodia Bilateral Military : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सराव ‘सिनबॅक्स- II 2026’ साठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

नवी दिल्ली : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती ‘सिनबॅक्स-II 2026’ साठी भारतीय लष्कराची एक तुकडी रवाना झाली आहे. हा सराव 4 ते 17 मे 2026 या कालावधीत कंबोडियातील, कंम्पोंग स्पेयू प्रांतातील, टेको सेन फ्नोम थॉम म्रीस प्रॉव रॉयल कंबोडियन हवाई दल प्रशिक्षण केंद्रात आयोजित केला जाईल.



मित्र राष्ट्रांसोबत सुरू असलेल्या भारताच्या संरक्षण सहकार्यांतर्गत, जागतिक सुरक्षा आव्हानांच्या बदलत्या पार्श्वभूमीवर कंबोडियासोबतचा हा सिनबॅक्स-II सराव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा सराव संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील प्रकरण VII च्या चौकटीत राहून केला जाणार असून, त्यामध्ये निम-पारंपारिक वातावरणात लष्करी मोहिमा राबवण्यासाठी कंपनी स्तरावरील संयुक्त प्रशिक्षण दिले जाईल. भारतीय लष्कराच्या या तुकडीत 120 सैनिकांचा समावेश असून, त्यातील बहुतांश सैनिक ‘मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट’च्या एका बटालियनचे आहेत, तर कंबोडियाकडून ‘रॉयल कंबोडियन आर्मी’च्या 160 सैनिकांचा समावेश असेल.



हा संयुक्त सराव संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर आधारित असेल. यामध्ये शांतता सैनिकांना सध्या ज्या प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवायांना सामोरे जावे लागते, त्याचा सराव केला जाईल. विविध चर्चा आणि सामरिक सरावांच्या माध्यमातून हे ध्येय साध्य केले जाईल. शेवटी एका सर्वसमावेशक प्रमाणीकरण सरावाने या प्रशिक्षणाचा समारोप होईल. या सरावाचा भाग म्हणून ड्रोन ऑपरेशन्स, मोर्टार आणि स्नाइपर रणनीती यांसारख्या विशेष कौशल्यांचा सराव केला जाईल. दोन्ही देशांच्या तुकड्यांमधील परस्पर समन्वय, तांत्रिक सहकार्य आणि लष्करी ताळमेळ वाढवणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. हा सराव केवळ जागतिक शांतता राखण्यासाठीची दोन्ही देशांची क्षमता दर्शवणार नाही, तर निम-शहरी भागात शत्रू दलांविरुद्ध राबवलेल्या विविध मोहिमांतून मिळालेले अनुभव आणि सर्वोत्तम लष्करी पद्धतींच्या देवाणघेवाणीसाठी देखील मदत करेल. सिनबॅक्स-II 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कंबोडियामधील वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक असून, यामुळे प्रादेशिक सुरक्षा आव्हाने हाताळण्यासाठी परस्पर सामंजस्य वाढेल आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर