भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड रद्द, महत्त्वाचे कारण समोर

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा गायत्री रुपचंद गौर ऊर्फ गायत्री चेतन भंगाळे यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल ठरविण्यात आली आहे. नगर विकास विभागाने सोमवारी याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी केला आहे.


निवड रद्द होण्याचे कारण काय ?


गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून निवडणूक लढविताना सादर केलेले जात प्रमाणपत्र जळगाव येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यानंतर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १६ (१क) व (ब) नुसार कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता.


या प्रस्तावाच्या अनुषंगाने २३ एप्रिल २०२६ रोजीच्या जात पडताळणी समितीच्या आदेशानुसार भंगाळे यांची नगराध्यक्षपदाची निवड २३ एप्रिल २०२६ पासून भूतलक्षी प्रभावाने रद्दबातल ठरविण्यात आली आहे. या निर्णयानुसार गायत्री भंगाळे यांना भुसावळ नगरपरिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा