Sunetra Pawar : बारामतीचा विजय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित – सुनेत्रा पवार

मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय हा अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी दिली. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. तसेच, या विजयाचा जल्लोष न करता कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.


बारामतीकरांनी दाखवलेला हा विश्वास म्हणजे अजितदादांच्या विकासकामांवरील अढळ श्रद्धा असल्याचे त्या म्हणाल्या. "बारामतीकरांना अशी पोटनिवडणूक नकोच होती; परंतु परिस्थितीमुळे ती झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दादांविषयीची आपली खरी भावना व्यक्त केली आहे," असे सांगत सुनेत्रा पवार भावूक झाल्या.



शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आजवर केलेल्या कामाची आणि सेवेची पोचपावती मतदारांनी आपल्या मतांतून दिली आहे. बारामती हे माझे कुटुंब असून, अजितदादांनी दाखवलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, शरद पवारांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याची घेतलेली भूमिकाही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.




ही नव्या बारामतीची सुरुवात


मतदारांनी दाखवलेल्या या प्रचंड विश्वासाने आपल्यावरील जबाबदारी वाढल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, कुणीही मिरवणुका काढू नका किंवा गुलाल उधळू नका. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करूया. हा शेवट नाही, तर निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची सुरुवात आहे."

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४