Akola Crime : अकोल्यात आजोबाकडून चिमुरडीवर अत्याचार; आई- वडील कामावर जाताच आजोबा व्हायचा सैतान

अकोला : पुण्यात चिरमुरडीवर अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली या घटनेच्या धक्कातून राज्य सावरत नाही तोच अकोल्यातून धक्कादायक बातमी आली आहे. अकोल्यात ६० वर्षाच्या वृद्धाने स्वतःच्या नातीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.



नेमकं काय घडलं ?


सदर घटना अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आई वडील कामावर जायचे. मुलगी घरी एकटीच असायची. याच गोष्टीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केले. चिमुरडीवर सलग पाच दिवस अत्याचार झाले.



प्रकरण बाहेर कसं आलं ?


वृद्धाने दाखवलेल्या भीतीमुळे मुलीने आई वडिलांना सांगायची हिंमत केली नव्हती. पण सततचे अत्याचार मुलीला सहन नाही झाले, तिने शेवटी आई वडिलांना सर्व सांगितले आणि आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडित मुलीला घेऊन आई वडिलांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलीस पथक तडक आरोपीला अटक करण्यासाठी निघाले. पण आपण अडचणीत येणार याची जाणीव होताच अत्याचार करणारा आरोपी फरार झाला. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांची तीन पथके आरोपीला शोधत आहेत.



अल्पवयीन मुलींवरील हे अत्याचार कधी थांबणार ? यावर ठोस उपाय होणार का ? असे प्रश्न सर्व स्तरांतून विचारले जात आहेत. अल्पवयीन मुली आता स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर