Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर लक्ष राहिल, कामाची अंमलबजावणी प्रभावी होईल, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमता विभाग अँड.आशिष शेलार यांनी आज दिले.



राज्याच्या कृत्रिम बुध्दीमता धोरणाला राज्य मंत्री मंडळाने मंजूरी दिली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमता विभागाने काम करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री अँड. यांनी मुंबई महापालिका आणि इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमता विभागाची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाआयटीचे संचालक संजय काटकर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका भूवनेश्वरी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



यावेळी मुंबई महापालिका दैनंदिन कामकाजात एआयचा वापर कशा पध्दतीने करते आहे याचे सादरीकरण महापालिकेतर्फे करण्यात आले. नालेसफाईमध्ये पारदर्शकता यावी म्हणून तसेच नागरी सेवांमध्ये पारदर्शक व गतीमानता यावी म्हणून एआयचा वापर करण्यात येत असल्याचे सादरीकरण करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी चँट बाँट या एआय तंत्रज्ञानामार्फत मार्फत विभाग कार्यालयात संकलित करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले. मात्र यामध्ये एआयचा वापर करुन अधिकची सुधारणा करा व कोणत्याही महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तक्रार त्याने बोलल्यानंतर तो व्हिडीओ रेकॉर्ड होऊन तो व्हिडीओ संबंधित विभागकडे जाईल व त्यावर कारवाई तातडीने कारवाई अथवा कार्यवाही होईल, कशा पध्दतीने नियोजन करा. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मंत्रालयात ई फाईल व ई स्वाक्षरी ची संकल्पना प्रभावीपणे राबवली आहे त्याच पध्दतीने मुंबई महापालिकेत ही संकल्पना राबवा व पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने कामकाज होईल याचे नियोजन करा. तसेच टेंडर पद्धतीमध्ये पारदर्शकता येणे आवश्यक आहे. महापालिका टेंडर मध्ये अनेक वेळा व्हेरिएशन केले जाते त्यावर एआय नियंत्रण आणा, जेणेकरून नागरिकांना अशा पध्दतीने झालेल्या कामांची माहिती मिळू शकेल तसेच व्हेरिएशनमध्ये करण्यात आलेला निर्णय योग्य आहे की नाही हे एआय मार्फत स्पष्ट होईल अशा पध्दतीचे नियोजन करा, अशा सूचना मंत्री अँड. शेलार यांनी केल्या. दरम्यान, महापालिकेच्या कामकाजात नागरिक सहभागीता वाढावी व तरुणांच्या नवनवीन कल्पना समजून त्याचा वापर प्रशासनामध्ये करता यावा यासाठी तरुणांची हे हँकेथॉन आयोजित करा, असेही मंत्री शेलार यांनी सूचित केले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी