Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी केंद्राने राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ (The Prevention of Insults to National Honour Act, 1971) या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ५ मे रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


या दुरुस्तीमुळे ‘वंदे मातरम्’ गाताना अडथळा आणणे, त्याचा अवमान करणे किंवा कार्यक्रमात त्याचा अपमानास्पद वापर करणे हे आता दंडनीय गुन्हा ठरणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार (Jana Gana Mana) राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेचा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. आता हाच नियम ‘वंदे मातरम्’लाही लागू होणार असल्याने राष्ट्रीय गीतालाही समान कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.



यापूर्वी (Ministry of Home Affairs) गृह मंत्रालयाकडून ‘वंदे मातरम्’ संदर्भात दिलेल्या सूचना केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या. मात्र, नव्या दुरुस्तीमुळे या सूचनांना कायदेशीर बळ मिळणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सर्व सहा कडवी (सुमारे ३ मिनिटे) गायली किंवा वाजवली जावीत, असे सांगण्यात आले आहे. तसेच, ज्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही असतील, तिथे ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य देण्याचीही सूचना आहे.


‘वंदे मातरम्’ हे प्रसिद्ध साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (Bankim Chandra Chattopadhyay) यांनी लिहिले असून ते त्यांच्या आनंदमठ (Anandamath) या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या गीताने देशभक्तीची भावना जागवण्यात मोठी भूमिका बजावली होती. १९३७ साली काँग्रेसने त्यातील पहिल्या दोन कडव्यांना मान्यता दिली आणि पुढे भारतीय राज्यघटनेने ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून त्याला दर्जा दिला.



केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मानाबाबत अधिक कडक भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या अपमानास आळा बसावा, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि