NCP : पदे चार, इच्छुक पन्नास; राष्ट्रवादीत रिक्त जागांसाठी दावेदारांची फौज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, पक्षात आता रिक्त असलेली महत्त्वाची पदे भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या एका जागेसह महिला आयोग, मुंबई अध्यक्ष आणि युवक प्रदेशाध्यक्ष या पदांसाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत असून, इच्छुकांनी 'देवगिरी' बंगल्याच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत.


सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवर वर्णी लागावी यासाठी पक्षातील चार माजी खासदार शर्यतीत आहेत. यामध्ये आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि भाजपमधून (BJP) अलीकडेच आलेले संजयकाका पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय भुजबळ आणि मलिक कुटुंबीयांकडूनही दावा केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावेही या शर्यतीत आघाडीवर आहेत.



महिला आयोगासाठी मोठी चढाओढ


रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त आहेत. महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत आहेत.



मुंबई अध्यक्षांची प्रतीक्षा संपणार?


गेल्या १० महिन्यांपासून रिक्त असलेल्या युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी अद्याप कोणतीही ठोस हालचाल दिसत नसली, तरी मुंबई अध्यक्षपदासाठी मात्र रस्सीखेच सुरू आहे. समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. सध्याचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांनी या पदासाठी आपली इच्छा पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली