Govandi Crime : गोवंडीत ६ वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार; 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील गोवंडी (Mumbai Govandi Area) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या ६ वर्षीय चिमुकल्यावर शाळेतीलच एका ४५ वर्षीय शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत.



वर्षभरापासून सुरू होते गैरवर्तन




प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजेश महाकाळ असे या नराधम आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी गेल्या वर्षभरापासून या निष्पाप विद्यार्थ्यासोबत सातत्याने गैरवर्तन करत होता. शाळेच्या आवारातच असलेल्या एका रिकाम्या खोलीत या विद्यार्थ्याला एकटे गाठून तो त्याच्याशी अश्लील चाळे आणि गैरवर्तन करत असे.



चिमुकल्याने घरच्यांना सांगितला प्रसंग आणि बिंग फुटले



हा संपूर्ण भयानक प्रकार तेव्हा उजेडात आला, जेव्हा पीडित विद्यार्थ्याने धाडस करून आपल्यासोबत घडत असलेला प्रसंग घरच्यांना सांगितला. मुलाने दिलेली माहिती ऐकून हादरलेल्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट गोवंडी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी शिपायाविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत, पोलिसांनी आरोपी शिपायावर 'पोक्सो' (POCSO - बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात असून, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचीही सखोल चौकशी करून पुढील तपास केला जात आहे.



मालाडमध्येही घडली होती अशीच संतापजनक घटना


गोवंडीच्या या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी मालाड येथे घडलेल्या अशाच एका लाजिरवाण्या प्रकाराची आठवण ताजी झाली आहे. मालाड पश्चिम येथील एका खासगी शाळेत अवघ्या ४ वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. १२ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी कारवाई करत ६ फेब्रुवारी रोजी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मालाड प्रकरणातील आरोपीही शाळेत शिपाई म्हणूनच काम करत होता. चिमुकलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी त्याच्यावरही 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. अटकेनंतर न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान पोलिसांनी शाळेच्या विश्वस्तांकडे (Trustee) सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, त्यांनी फुटेज देण्यास नकार दिला आणि पोलिसांना वेळेवर माहितीही दिली नाही. या गंभीर हलगर्जीपणामुळे पोलिसांनी शाळेच्या विश्वस्तांवरही गुन्हा दाखल करत कारवाई केली होती.

Comments
Add Comment

Nalasopara Name Change : नालासोपाराचं नाव बदलण्याची मागणी; ‘शूरपरक’ नावासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

मुंबई : नालासोपाराचे प्राचीन नाव ‘शूरपरक’ पुन्हा बहाल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. वसई-विरार शहर

EatClub Brands FSSAI License Suspended : EatClub Brandsच्या किचनमध्ये नेमकं काय आढळलं? FDAच्या तपासणीत धक्कादायक त्रुटी; FSSAI परवाना निलंबित

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील EatClub Brands Private Limited या खाद्य आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

मंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय

Government Canteens : चहा-समोसा विसरा! सरकारी बैठका आणि उपहारगृहांमध्ये आता पौष्टिक मेन्यू

मुंबई : महाराष्ट्रातील शासकीय उपहारगृहे तसेच सरकारी बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये आता आरोग्यदायी

Mumbai Sawantwadi Daily Express : मुंबई-सावंतवाडी प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून दैनंदिन एक्सप्रेस सेवा सुरू

मुंबई : कोकणातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज

Ganeshotsav Mandal : मुंबईतील प्रत्येक श्रीगणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण

मंडळातील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना मिळणार प्रशिक्षण मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सार्वजनिक