Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा 

मंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  ( Mumbai Goa Highway)




"कोकणातील रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सध्या दुभाजक, उड्डाणपूल, साईड पट्टी इत्यादी कामे सुरू असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे.  वाहतुकीसाठी अपेक्षित सोयी सुविधा पूर्ण झालेल्या नसताना खारपाडा येथे होणारी टोल आकारणी बंद व्हावी या कोकणवासीयांच्या भावनेचा आदर करत टोलवसुली स्थगित करावी" अशी मागणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.


भविष्यात मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांना टोलमधे सवलत देण्याबाबतही विचार व्हावा अशी विनंती ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी केली आहे. ( Highway Toll Postponement)

Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.