Johny Johny Yes Papa Controversy : ‘जॉनी जॉनी येस पापा’ मुलांना खोटं बोलायला शिकवते? उत्तर प्रदेशच्या शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य चर्चेत

उत्तर प्रदेश : बालपणी सर्व मुलांना शिकवली जाणारी इंग्रजी कविता म्हटलं की अनेकांच्या ओठांवर सहज येतं ते नाव म्हणजे ‘जॉनी जॉनी येस पापा...’ (Johny Johny Yes Papa)ही कविता जवळपास प्रत्येकाने लहानपणी म्हटलेली असते. मात्र आता याच लोकप्रिय कवितेबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री आणि प्रभारी मंत्री योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyay) यांनी ही कविता लहान मुलांसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तसेच ती मुलांना खोटे बोलण्यास प्रवृत्त करते, असा इशाराही त्यांनी पालक आणि शिक्षकांना दिला आहे.



६ मे रोजी कानपूरमधील मर्चंट चेंबर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षामित्रांच्या’ मानधनवाढ समारंभात बोलताना योगेंद्र उपाध्याय यांनी शिक्षणपद्धती, संस्कार आणि मुलांच्या जडणघडणीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘जॉनी जॉनी येस पापा’ या कवितेचा उल्लेख करत तिच्यावर वक्तव्य केले. “इटिंग शुगर? नो पापा...” (Eating Sugar? No papa...)अशा ओळी मुलांच्या मनात लहानपणापासून खोटे बोलण्याचे बीज पेरतात. या कविता मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवतात,” असे ते म्हणाले.


त्यांनी पुढे पाश्चात्य संस्कृतीवर आधारित इंग्रजी कवितांवरही टीका केली. अशा कविता मुलांना जीवनमूल्ये शिकवत नाहीत, असे सांगत त्यांनी जुन्या हिंदी कवितांचा उल्लेख केला. “पूर्वीच्या पिढ्या ज्या हिंदी कविता वाचत मोठ्या झाल्या, त्यामध्ये संस्कार, नैतिकता आणि जीवनाची सखोल मुल्ये दडलेली होती. आजच्या पिढीला अशाच मुल्याधारित शिक्षणाची गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.



यावेळी त्यांनी शिक्षकांनाही महत्त्वाचा संदेश दिला. “शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसावे. शिक्षक हा फक्त अभ्यास शिकवणारा नसून मुलांना योग्य जीवनमार्ग दाखवणारा मार्गदर्शक असतो. ज्या दिवशी शिक्षक अभ्यासासोबत मूल्यांवर चर्चा करू लागतील, त्या दिवशी ते खऱ्या अर्थाने गुरू बनतील,” असे ते म्हणाले.


भावी पिढीची योग्य जडणघडण करण्यासाठी शिक्षणासोबत संस्कार आणि नैतिक मूल्ये देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या गोरखपूर येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही उपस्थितांना दाखवण्यात आले.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि