भारतीय क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेच पण भारतीय संघाच्या कामगिरीत आणखी सुधावरणा व्हावी यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयपीएल हंगाम संपताच भारतीय टीमला नवा कोच मिळू शकतो. यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरु आहेत. भारतीय टीमला साईराज बहुतुले Sairaj Bahutuleनवीन कोच म्हणून मिळण्याची दाट शक्यता आहे.
साईराज बहुतुले हे नेमके कोण आहेत?
साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) हे क्रिकेटविश्वात मोठे नावाजलेले नाव आहे. बहुतुले हे फिरकीपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी भारतातच नव्हेत तर जगभरात ओळखले जातात. स्पिन बॉलिंगमधील त्यांच्याकडे असणारे ज्ञान आजघडीला कोणत्याही अन्य कोचकडे नाही, असे म्हटले जाते. सध्या बहुतुले हे पंजाब किंग्स या संघाला प्रशिक्षण देत आहेत. साईराज बहुतुले यांनी भारतीय संघाकडून 2 कसोटी सामने खेळलेले आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार साईराज बहुतुले हा भारतीय संघात स्पिन गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून सामील होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर Gautam Gambhir हेच बहुतुले यांना संघात प्रशिक्षक म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गौतम गंभीर यांनी बीसीसीआयशी याबाबत चर्चा केली आहे.
भारतीय संघाकडे सध्या किती कोच ?
भारतीय संघाला प्रशिक्षण देणाऱ्या चमुमध्य गौतम गंभीर Gautam Gambhir हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून आहेत. त्यानंतर सिंताशू कोटक हे फलंदाजीचे कोच आहेत. मोर्ने मार्केल हे वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देतात. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना प्रशिक्षित करतात. भारताकडे फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नाही. त्यामुळेच बहुतुले हे लवकरच भारतीय संघात फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील होऊ शकतात. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






