Sanjeev Arora ED : ईडीची पंजाबच्या उद्योगमंत्र्यांवर पुन्हा धाड; दिल्ली-चंदीगडमध्ये एकाचवेळी छापेमारी, राजकारण तापलं

पंजाब : पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा (Sanjeev Arora) पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या रडारवर आले आहेत. शनिवारी सकाळी ईडीच्या पथकांनी दिल्ली आणि चंदीगडमधील त्यांच्या विविध ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली. गेल्या महिन्यात तिसऱ्यांदा झालेल्या या कारवाईमुळे पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी चंदीगडमधील मंत्री अरोरा यांचे अधिकृत निवासस्थान, कार्यालय तसेच हॅम्पटन स्काय रिअॅल्टी लिमिटेडशी संबंधित ठिकाणी तपास मोहीम राबवली. सकाळपासूनच अनेक वाहनांतून पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली.



याआधी १७ एप्रिल रोजीदेखील ईडीने परकीय चलन उल्लंघन प्रकरणात अरोरा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. आता मोहालीतील खरड परिसरात कथित लायझन एजंट नितीन गोहल यांच्या निवासस्थानी झालेल्या कारवाईनंतर या तपासाला आणखी वेग आला आहे.



१०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा संशय:


ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, संजीव अरोरा यांच्या कंपनीमार्फत १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कथित मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा संशय आहे. मोबाईल फोनच्या बनावट खरेदी-विक्री आणि निर्यातीच्या व्यवहारांद्वारे दुबईमार्गे पैसा भारतात परत आणल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकाराला ‘राऊंड ट्रिपिंग’ असे म्हटले जाते.



तपास यंत्रणांच्या मते, दिल्लीतील अनेक बनावट कंपन्यांच्या नावावरून जीएसटी बिले तयार करण्यात आली. त्याद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC), जीएसटी रिफंड आणि ड्युटी ड्रॉबॅकचा गैरफायदा घेत सरकारी महसुलाला मोठा फटका देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.


सध्या ईडीची तपास मोहीम सुरू असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि