Valvan Mahotsav 2026 : महिला बचत गटांच्या हाताची चव पोहोचणार थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत

येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी ‘वाळवण महोत्सव'


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे ‘वाळवण महोत्सव २०२६-सुगंध उन्हाळ्याचा’ या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) हा महोत्सव भरिवण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध साठवणीच्या खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार आहे. यामध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी, विविध मसाले आदी पदार्थांचा समावेश असणार आहे. या महोत्सवात ‘टेस्टींग काउंटर’ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.



महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक आणि घरगुती खाद्यपदार्थांचा आस्वाद मुंबईकरांना या महोत्सवातून घेता येणार आहे. महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध साठवणीच्या खाद्यपदार्थांचे विक्री व प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार आहे. यामध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी, विविध मसाले आदी पदार्थांचा समावेश असणार आहे. या महोत्सवात ‘टेस्टींग काउंटर’ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


याशिवाय गहू, तांदूळ, नाचणी आणि बटाट्यांपासून तयार करण्यात आलेल्या कुरकुरीत कुरड्या व पापड, ताजी कैरी लोणचे, लिंबू लोणचे, चविष्ट सांडगे आणि सांडगी मिरची, घरगुती मसाले तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थ महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. महिला बचत गटांच्या हातची चव थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. या महोत्सवातून महिला उद्योजकतेला चालना देण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक उन्हाळी खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या वाळवण महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा