Himanta Biswa Sarma : हिमंता बिस्वा सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री, सलग दुसऱ्यांदा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड

आसाम : आसामच्या राजकारणात पुन्हा एकदा हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे वर्चस्व कायम राहिले असून, त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. यामुळे हिमंता बिस्वा सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री बनणार आहेत. १२ मे रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या भव्य शपथविधी सोहळ्यात ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


गुवाहाटी येथे भाजप आणि एनडीए आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीनंतर नड्डा यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.



जेपी नड्डा यांनी सांगितले की, विधानसभा पक्षनेतेपदासाठी एकूण आठ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. रणजित कुमार दास, विश्वजित, अजंता निओ, रामेश्वर तेली, राजदीप राय, अशोक सिंघल, पियुष हजारिका आणि चक्रधर गोगोई यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे या सर्व प्रस्तावांना भाजप तसेच मित्रपक्षांच्या आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.


एनडीएतील मित्रपक्षांचे नेते आणि आमदार देखील बैठकीला उपस्थित होते. आसाम गण परिषदचे नेते अतुल बोरा (Atul Bora) यांनीही हिमंता यांच्या नावाला समर्थन दिले. त्यामुळे कोणतीही मतभिन्नता न होता हिमंता बिस्वा सरमा यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड निश्चित झाली.


या निवडणुकीत हिमंता बिस्वा सरमा यांनी संपूर्ण प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आसाममध्ये दमदार कामगिरी करत १२६ सदस्यीय विधानसभेत एकट्याने ८२ जागा जिंकल्या. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने तब्बल १०२ जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमत मिळवले.



राजकीय विश्लेषकांच्या मते, हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या कार्यकाळात कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि ईशान्य भारतातील विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. याच कामगिरीच्या जोरावर भाजपला पुन्हा जनतेचा कौल मिळाल्याचे मानले जात आहे.





शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे अनेक केंद्रीय नेते, एनडीएतील मित्रपक्षांचे प्रमुख तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमोर रोजगार, पूरस्थिती, उद्योगवाढ आणि सीमावाद यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.



आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री


सर्बानंद सोनोवाल - २४ मे २०१६ ते १० मे २०२१ - ४ वर्षे, ३५१ दिवस
हिमंता बिस्वा सरमा - १० मे २०२१ पासून... - ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
हिमंता बिस्वा सरमा - १२ मे २०२६ रोजी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार
Comments
Add Comment

Ola S1Z Electric Scooter भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि रेंज

मुंबई : इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी Ola Electricने नवीन Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर