BRICS : दिल्लीत १४ आणि १५ मे रोजी ब्रिक्स शिखर परिषद

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध, युक्रेन संघर्ष आणि ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या यजमानपदाखाली 'ब्रिक्स' देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक १४ आणि १५ मे रोजी नवी दिल्लीत पार पडणार आहे. जागतिक व्यवस्थेत मोठे बदल होत असताना होणारी ही बैठक राजनैतिक दृष्टिकोनातून अत्यंत कळीची मानली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या बैठकीची अधिकृत घोषणा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होतील.



पहिल्या दिवशी (१४ मे) भारत मंडपम येथे होणाऱ्या सत्रात जगभरातील ज्वलंत प्रश्न आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी (१५ मे) बिल्डिंग फॉर रेझिलिअन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी” या संकल्पनेवर आधारित विशेष सत्र होईल. यात ब्रिक्सच्या गेल्या २० वर्षांतील वाटचालीचा आढावा आणि भविष्यातील धोरणे ठरवली जातील. जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीय प्रणालींमध्ये सुधारणा करण्यावरही या बैठकीत भर दिला जाणार आहे.



पंतप्रधान मोदींशी संवाद : या बैठकीसाठी येणारे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. 'सेवा तीर्थ' येथे पंतप्रधानांसोबत परराष्ट्र मंत्र्यांचा संयुक्त संवाद होईल. तसेच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाहुण्यांसाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे. ही बैठक म्हणजे वर्षाच्या उत्तरार्धात नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेची पूर्वतयारी मानली जात आहे. भारताकडे लवकरच ब्रिक्सचे अध्यक्षपद येणार असल्याने ही बैठक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि