SRHvsGT : हैदराबादला चिरडत गुजरात अव्वल स्थानी, गोलंदाजांच्या बळावर सलग पाचवा विजय

अहमदाबाद : विजयासाठी २० षटकांमध्ये अवघ्या १६९ धावा करण्याचे आव्हान सनरायर्झस हैदराबादला पेलवले नाही. १४. ५ षटकांमध्ये अवघ्या ८६ धावांवरच हैदराबादचा डाव गुंडाळला गेला. ८३ धावांनी यजमान गुजरातने विजय मिळवत पाहूण्या हैदराबादच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली.



गुजरात टायटन्सने गोलंदाजांच्या जोरावर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवत आहे. या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक २५ विकेट्स घेणाऱ्या संघात अव्वल स्थानी गुजरात विराजमान आहे. त्यांच्या गोलंदाजांची ताकद काय, हे मंगळवारी आक्रमक फलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिसली. कागिसो रबाडाने पॉवर प्लेमध्ये हैदराबादचे कंबरडे मोडले आणि त्यानंतर जेसन होल्डरनेही तीन धक्के दिले. गुजरातने सलग पाचव्या विजयाची नोंद करताना आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.



लक्ष्य माफक वाटत असले तरी कागिसो रबाडाने पहिल्याच स्पेलमध्ये हैदराबादला बॅकफूटवर फेकले. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला भोपळ्यावर पाठवले. त्यानंतर रबाडाच्या वेगवान माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर रबाडाने चतुराईने मारा केला. त्याने अभिषेक शर्माला ( ६) त्रिफळाचीत केले आणि त्यानंतर इशान किशनची ( ११) विकेट मिळवली. रवीचंद्रन स्मरणला ( ९) फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले खरे, परंतु रबाडासमोर तोही टिकला नाही. रबाडाने त्याची स्पेल ४-०-२८-३ अशी पूर्ण केली. रबाडाने यंदाच्या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १२ विकेट्स घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा नंबर येतो.



सलिल अरोरा ( १६) आणि हेनरिच क्लासन यांची २४ धावांची भागीदारी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने तोडली आणि हैदराबादचा निम्मा संघ ५६ धावांत तंबूत परतला. पुढच्याच षटकात जेसन होल्डरच्या हाफ लेंथ चेंडूवर क्लासनला ( १४ ) पूल शॉट मारण्यास भाग पाडले आणि बटलरने आणखी एक सुरेख झेल टिपला. त्याच षटकात नितीश कुमार रेड्डीला ( २) माघारी पाठवून होल्डरने गुजरातचा विजय निश्चितच केला. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिलेली. राशिद खानने शेवटची विकेट घेऊन हैदराबादला १४.५ षटकांत ८६ धावांवर गुंडाळले आणि ८२ धावांनी विजय पक्का केला. गुजरातचा हा आयपीएल इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला.



गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी गुजरात टायटन्ससाठी आयपीएल स्पर्धेच्या १९ व्या मोसमातील ५६ व्या सामन्यात अर्धशतक झळकावले. मात्र त्यानंतरही गुजरातला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १७० धावांचा आकडाही गाठता आला नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत गुजरातला १६८ धावांवर रोखण्यात यश मिळवले. हैदराबादने गुजरातला ५ झटके दिले. त्यामुळे ऑरेंज आर्मीला १६९ धावांचे आव्हान मिळाले.



सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडले. गुजरात घरच्या मैदानात सहज २०० धावा करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र गुजरातची निराशाजनक सुरुवात झाली. कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज जोस बटलर हे दोघेही दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. शुभमनने ५ तर बटलरने ७ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकाही जोडीला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही.



निशांत सिंधु याने १४ चेंडूमध्ये १ सिक्स आणि ३ चौकारांसह २२ धावा केल्या. साई सुदर्शन याने अर्धशतक झळकावले. मात्र त्याला वेगात धावा करता आल्या नाहीत. साईने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या. साईने ४४ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.वॉशिंग्टन सुंदर यानेही अर्धशतक केले. सुंदरने ३३ चेंडूमध्ये १५१.५२ च्या स्ट्राईक रेटने ५० रन्स केल्या. सुंदरने या खेळीत १ षटकार आणि ७ चौकार लगावले. तर जेसन होल्डर आणि राहुल तेवतिया हे दोघे नाबाद परतले. होल्डरने ११ तर राहुलने ४ धावा केल्या. हैदराबादसाठी प्रुफल हिंगे आणि साकिब हुसैन या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स याने १ विकेट घेतली. पॅट कमिन्स सर्वांधिक टिच्चून गोलंदाजी करताना चार षटकांमध्ये केवळ २० धावा दिल्या. हैदराबादकडून सर्वांधिक कमी धावा कमिन्स याने दिल्या.


प्ले ऑफच्या शर्यतीत चुरस : पहिल्या सहा सामन्यांत केवळ ३ विजय मिळवणाऱ्या गुजरातच्या संघात जेसन होल्डर दाखल झाल्यापासून बदल पाहायला मिळतोय. त्यांनी मागील पाचही सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थानावर कब्जा करताना प्ले ऑफच्या शर्यतीला मोठी कलाटणी दिली आहे. गतविजेता आरसीबीलाही दुसऱ्या टप्प्यात पराभवाची चव चाखावी लागली आहे आणि ते आज दुसऱ्या क्रमांकावर घसरले. सनरायर्झस हैदराबाद, पंजाब किंग्ज हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. सीएसके व राजस्थान रॉयल्स अजूनही प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत.


सलग तिसऱ्या पर्वांत साईच्या ५०० धावा पूर्ण : साई मैदानावर उभा राहिला आणि यंदाच्या पर्वातील सहावे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची खेळी करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. यंदाच्या पर्वात ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला. साईने सलग तिसऱ्या पर्वात ( ५२७ धावा, २०२४ आणि ७५९ धावा, २०२५) पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम