BMC News : सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अॅक्शन मोडवर

महापालिका प्रमुख रुग्णालयांमधील सुविधांचा घेतला आढावा


मुंबई : महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील विविध सुविधांबाबत महापालिका आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदीर्गे यांनी आढावा घेतला. विनाखर्च चांगल्या सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येईल या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांना सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे निर्देश देत यासाठी प्रयत्न रुग्णालयात प्रयत्न करावेत आणि यासाठी प्रत्येक अधिष्ठाता आणि अधिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे अशाप्रकारच्या सूचनाही भांदिर्गे यांनी केल्या.



मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांसोबत आरोग्य सेवांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे जी यांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे जी, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.माला दीक्षित सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (के. ई. एम.) अधिष्ठाता डॉ. हरिष पाठक जी, बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता आणि संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये डॉ. शैलेश मोहिते जी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालय अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) छाया शिंदे जी, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे जीही उपस्थित होते.


या बैठकीमध्ये रुग्णालयामध्ये डॅशबोर्ड प्रणाली सुरू करण्याबाबत चर्चा, जेणेकरून सेवा व व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, झिरो प्रिस्क्रिप्शन उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विचारविनिमय, रुग्णांसाठी लागणारी वैद्यकीय मशिनरी उपलब्धता आणि आवश्यक उपकरणांचा आढावा, रुग्णालयांमधील औषधांचा पुरेसा साठा ठेवणे तसेच कमी असलेल्या औषधांचा नियमित पाठपुरावा करण्याबाबत चर्चा, विविध रुग्णालयांमध्ये गरजेनुसार सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम व मजबूत करण्याबाबत चर्चा, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या विविध समस्या, अडचणी व आवश्यक सुविधांबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला. यामध्ये रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा, मोफत उपचार योजना आणि भविष्यातील प्रभावी उपाययोजनांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Comments
Add Comment

Kurla Cleanliness Drive : कुर्ला परिसरातील झोपडपट्टी आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा आता साफसुफ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्‌यांच्या

Mid Vaitarna Dam : मध्य वैतरणा धरणातील कापलेल्या झाडांच्या बदल्यात बीडमध्ये लावलेली २ लाख झाडे गेली कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जेव्हा मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती, तेव्हा मध्य वैतरणा

मुंबई महापालिकेच्या वीज वापराचे होणार मूल्यांकन; महापालिकेच्या वतीने होणार तांत्रिक समितीचे लवकरच गठन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात

लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ! भाजप महायुतीच्या वतीने उत्तर मुंबईत भव्य पदयात्रेचे आयोजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): लोकशाही मूल्यांचे रक्षण, लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण आणि अराजकतेविरोधात जनजागृती

मुंबईच्या श्रीगणेशोत्सवाची पर्यावरणपूरक उत्सवाकडे यशस्वी वाटचाल; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे गौरवोद्गार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासोबतच सहा

Central Railway Megablock: मुंबईकरांचे मेगाहाल होणार! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा सविस्तर

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि सुरक्षेची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी येत्या