Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे भाव

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं असलं तरी लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा कल वाढत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू असून शनिवार, १६ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. मात्र सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोनं आणि चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे खरेदी वाढली असली तरी दुसरीकडे जागतिक बाजारातील घडामोडींमुळे दरांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत.



शनिवार, १६ मे रोजी सकाळी देशातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. राजधानी दिल्ली (New Delhi) मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५८,०५० रुपयांवर आला. याआधी शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर तब्बल ३,२०० रुपयांनी म्हणजेच १.९३ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,६२,००० रुपयांवर बंद झाला होता. डॉलर मजबूत होणे आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस ४,५४८.४६ डॉलर इतका नोंदवला गेला.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५८,०५० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,८९० रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आणि कोलकाता (Kolkata) येथे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४४,७४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,९०० रुपये आहे. तर चेन्नई (Chennai) मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६१,०७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४७,६४० रुपये इतका आहे. तसेच पुणे (Pune) आणि बेंगळुरू( Bengaluru) येथेही २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५७,९०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,७४० रुपये नोंदवला गेला.



सोन्याची किंमत (प्रति १० ग्रॅम)

दिल्ली – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

मुंबई – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

अहमदाबाद – २२ कॅरेट: १,४४,७९० | २४ कॅरेट: १,५७,९५०

चेन्नई – २२ कॅरेट: १,४७,६४० | २४ कॅरेट: १,६१,०७०

कोलकाता – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

हैदराबाद – २२ कॅरेट: १,४४,७४० | २४ कॅरेट: १,५७,९००

जयपूर – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

भोपाळ – २२ कॅरेट: १,४४,७९० | २४ कॅरेट: १,५७,९५०

लखनौ – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

चंदीगड – २२ कॅरेट: १,४४,८९० | २४ कॅरेट: १,५८,०५०

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. १६ मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलो २,८९,९०० रुपयांवर आला. आदल्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर तब्बल २१,६०० रुपयांनी म्हणजेच ७.३ टक्क्यांनी घसरून प्रति किलो २,७५,००० रुपयांवर बंद झाला होता. यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीच्या दराने ४ लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर प्रति औंस ७८.२१ डॉलर इतका आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात भारताच्या सोन्याच्या आयातीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये सोन्याची आयात ८१.६९ टक्क्यांनी वाढून ५.६२ अब्ज डॉलरवर पोहोचली. त्याचप्रमाणे चांदीची आयात १५७.१६ टक्क्यांनी वाढून ४१.१ कोटी डॉलर झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सोन्याची आयात मूल्याच्या दृष्टीने २४ टक्क्यांनी वाढून विक्रमी ७१.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मात्र परिमाणाच्या दृष्टीने आयात ४.७६ टक्क्यांनी घटून ७२१.०३ टन इतकी झाली. दुसरीकडे चांदीची आयात जवळपास १५० टक्क्यांनी वाढून १२ अब्ज डॉलरवर पोहोचली असून परिमाणाच्या दृष्टीने ती ४२ टक्क्यांनी वाढून ७,३३४.९६ टन इतकी झाली आहे.
Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात