Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या दीर्घकालीन अडचणी सोडवण्यासाठी तसेच मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.


बुरोंडी मच्छीमार जेट्टी संदर्भात आयोजित विशेष बैठकीत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) बोलत होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, तसेच स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यावेळी सांगितले की, रत्नागिरी हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सागरी जिल्हा असून जिल्ह्याला तब्बल २३७ किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मिरकरवाडा बंदरानंतर दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला विशेष महत्त्व असून हर्णे, दाभोळ आणि बुरोंडी ही मासळी उतरविण्याची प्रमुख केंद्रे मानली जातात.


बुरोंडी हे मोठे मच्छीमार गाव असून येथे सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे. गावातील नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्थेशी सुमारे २५०० हून अधिक सभासद जोडलेले आहेत. परिसरात जवळपास १०० नोंदणीकृत मासेमारी नौका असून एक आणि दोन सिलेंडरच्या छोट्या नौकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र अद्ययावत जेट्टी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्थानिक मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.



याबाबत बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “बुरोंडीतील मच्छीमारांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आणि मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. बुरोंडी येथे जेट्टी उभारल्यास वाहतूक खर्चात मोठी बचत होईल, मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक जीवनमानात सुधारणा होईल.”





ते (Nitesh Rane) पुढे म्हणाले, “जेट्टीमुळे मच्छीमारांना मासळी थेट उतरविणे शक्य होईल. डिझेल, पाणी आणि इतर आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होईल. खराब हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यटन आणि व्यापारी हालचालींनाही चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.”



दरम्यान, केंद्र शासनाच्या “मत्स्यव्यवसाय आणि जलशेती पायाभूत सुविधा विकास निधी म्हणजेच Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF)” या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी स्पष्ट केले.


या जेट्टी प्रकल्पामुळे दापोली तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली