Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे जाणाऱ्या ५३२१२ क्रमांकाच्या सासाराम-पाटणा फास्ट पॅसेंजर गाडीच्या एका डब्याला अचानक भीषण आग लागली. ही घटना पहाटे सुमारे ५:४५ वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ६ वर उभ्या असलेल्या गाडीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गाडी स्थानकावर उभी असताना प्रवासी डब्यांमध्ये चढत होते. त्याचवेळी गाडीच्या पाचव्या डब्यातून धूर येत असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांनी धूर पाहताच तात्काळ आरडाओरडा करत इतरांना सावध केले. काही क्षणांतच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीच्या ज्वाळा संपूर्ण डब्यात वेगाने पसरल्या. त्यामुळे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला.





घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेवर बचावकार्य सुरू झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.


दरम्यान, आगीमुळे संबंधित डब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. डब्याला नेमकी आग कशी लागली, शॉर्ट सर्किटचे कारण काय होते आणि सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरील या भीषण आगीचा पहिला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि