मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार


मुंबई : राज्यातील टियर-२, टियर-३ आणि वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित ‘टेकमहा इम्पॅक्ट २०२६’ परिषदेत करण्यात आला.


या कराराअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग-शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी यांसाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, दूरसंचार अभियंत्यांच्या प्रशिक्षण व क्षमता विकासाला गती देण्यासाठी तेजस नेटवर्क्ससोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘डिजिटल महाराष्ट्र’ या आधुनिक आणि सर्वसमावेशक संकल्पनेच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बीएसएनएल ४जी/५जी, भारतनेट, नॅशनल नॉलेज नेटवर्क तसेच संरक्षण आणि सार्वजनिक नेटवर्क प्रकल्पांमध्ये तेजस नेटवर्क्सचा मोठा अनुभव असल्याने ही भागीदारी राज्यासाठी लाभदायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.


तेजस नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अर्नोब रॉय यांनी सांगितले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी आधुनिक दूरसंचार तंत्रज्ञानात प्राविण्य असलेले मनुष्यबळ आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण अभियंत्यांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची कंपनीची बांधिलकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तेजस नेटवर्क्सचे उपाध्यक्ष (विक्री) सुनील हंडू यांनी महाआयटीच्या विविध आयसीटी उपक्रमांमुळे महाराष्ट्र डिजिटल प्रशासनात अग्रणी राज्य म्हणून उदयास येत असल्याचे सांगितले. या उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर