Pune News : पुण्यातील सोसायटीत दुर्दैवी घटना; लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षीय शिवांशचा मृत्यू

पुणे : पुणे  शहरातील सिंहगड रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता लिफ्टमध्ये गेलेल्या एका ७ वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीसह परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगर येथील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. शिवांश शैलेश धूत असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. शिवांश हा रात्री सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान सोसायटीच्या आवारात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळताना तो अचानक इमारतीतील लिफ्टमध्ये गेला. त्याने लिफ्टमधील बटण दाबताच लिफ्ट सुरू झाली, मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यापूर्वीच ती अचानक मध्येच बंद पडली आणि शिवांश आत अडकला.



दरम्यान, बराच वेळ उलटूनही शिवांश बाहेर न आल्याने आणि तो परिसरात कुठेच दिसत नसल्याने सोसायटीतील रहिवाशांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर लिफ्टमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा संशय आल्याने तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत लिफ्ट उघडून शिवांशला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या शिवांशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अवघ्या ७ वर्षांच्या निष्पाप मुलाचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच संबंधित लिफ्टची नियमित देखभाल आणि सर्व्हिसिंग सोसायटीमार्फत केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे नेमकी ही दुर्घटना कशी घडली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.



सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. लिफ्टमध्ये नेमके काय घडले, तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत.

या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा निवासी इमारतींमधील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात असून सोसायट्यांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
Comments
Add Comment

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.