IPL Rules : आयपीएलमध्ये मोठे बदल होणार? १०० मीटरचा षटकार मारला तर थेट ८ धावा; आकाश चोप्राचा प्रस्ताव चर्चेत

Mumbai :  आयपीएल २०२६ मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडताना दिसून येच आहे. २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलागही आता संघासाठी छोटी गोष्ट झाली आहे. फलंदाजांच्या वाढत्या वर्चस्वामुळे स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि Commentator आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी काही धक्कादायक नियम बदल सुचवले आहेत. त्यातील १०० मीटरपेक्षा मोठ्या षटकाराला ८ धावा देण्याचा प्रस्ताव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.आकाश चोप्राच्या मते, हे नियम लागू झाले तर आयपीएलचा थरार आणखी वाढेल आणि गोलंदाजांनाही काही प्रमाणात फायदा होईल. आकाश चोप्रांनी तीन खास नियम सुचवले आहेत.

३ विकेट्स घेतल्या तर टाकता येणार ५ वी ओव्हर?


सध्या टी-२० क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त ४ ओव्हर्स टाकण्याची परवानगी आहे. मात्र आकाश चोप्राने सुचवलं आहे की, जर एखाद्या गोलंदाजाने आपल्या ४ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स घेतल्या तर त्याला अजून एक ओव्हर टाकण्याची संधी मिळावी. अस झाले तर सामन्यात गोलंदाजांचं महत्त्व वाढेल, असं त्याचं मत आहे आणि फलंदाजांवर अधिक दबाव निर्माण करता येईल.


मोठ्या विजयासाठी जास्त गुण देण्याची मागणी


दुसरा प्रस्ताव गुणतालिकेशी संबंधित आहे. चोप्राच्या मते, फक्त विजय नव्हे तर किती मोठ्या फरकाने विजय मिळाला हेही महत्त्वाचं ठरलं पाहिजे. जर एखाद्या संघाने १५-१६ ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठलं किंवा ४० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला, तर त्या संघाला २ ऐवजी ३ गुण द्यायला हवेत. त्यामुळे संघ मोठ्या विजयासाठी अधिक आक्रमक खेळ करतील आणि सामना आणखीन रोमांचक होईल.

१०० मीटरचा षटकारला ८ धावा  


सर्वात चर्चेत आलेला प्रस्ताव म्हणजे लांब षटकारासाठी अतिरिक्त धावा दिली पाहिजेत. आकाश चोप्राने सुचवलं आहे की, जर फलंदाजाने १०० मीटरपेक्षा मोठा षटकार मारला तर त्याला थेट ८ धावा मिळाव्यात. याआधीही रोहित शर्मा (Rohit Sharma) यानी ही अशाच प्रकारची कल्पना मांडली होती. मात्र हा नियम वादग्रस्त ठरू शकतो, असं आकाश चोप्रानी स्वता मान्य केले आहे. या प्रस्तावांवर अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरी क्रिकेट चाहत्यांमध्ये या नियमांची जोरदार चर्चा रंगली आहे.
Comments
Add Comment

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला