Nitesh Rane : हिंदुराष्ट्रात रस्त्यावर नमाज पठन खपवून घेणार नाही!

- मंत्री नितेश राणे यांचा इशारा; नियम मोडला तर 'बकरी ईद' तुरुंगात


मुंबई : "हिंदुराष्ट्रात" सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठण खपवून घेतले जाणार नाही. रस्ते हे नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आहेत. जर कुणी नियमांचे उल्लंघन करून राज्यात शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची पुढची 'बकरी ईद' तुरुंगातच साजरी होईल", असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिला. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होई. (Nitesh Rane)



राज्यभरात गोहत्या आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईसाठी सरकारने कठोर पावले उचलली असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट 'मोक्का'अंतर्गत कारवाई केली जाईल, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "ज्या राज्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, तिथे रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही. जर तुम्हाला रस्त्यावरच नमाज पढायचा असेल, तर मग मशिदी आणि मदरशांना कायमचे टाळे ठोकून द्या. रस्ते हे लोकांसाठी, रहदारीसाठी असतात. तुम्ही आधी बेकायदेशीर बांधकामे करता, 'लँड जिहाद'च्या नावाखाली जमिनी हडपता आणि मग तुम्हाला नमाजसाठी रस्तेही हवे असतात. मात्र, आमच्या 'देवाभाऊंच्या' महाराष्ट्रात अशी हिंमत कुणीही करू नये", असेही ते म्हणाले. (Nitesh Rane)



'वंदे मातरम' म्हणा, अन्यथा पाकिस्तानात जा!


मंत्री नितेश राणे म्हणाले, "लँड जिहाद असो वा लव्ह जिहाद, या सर्व प्रकारांवर आणि मदरशांवर आमचे अत्यंत बारीक लक्ष आहे. तिथून दहशतवादी निर्माण होणे थांबवायचे असेल, तर आधी मुल्ला-मौलवींसह सर्वांना 'वंदे मातरम' शिकवणे सुरू करा. तुम्ही भारतात राहता, त्यामुळे या देशाचा झेंडा आणि 'वंदे मातरम'चा सन्मान करणे तुमचा अधिकार आणि कर्तव्य आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांनी ते म्हटलेच पाहिजे. ज्यांना 'वंदे मातरम' म्हणायचे नसेल, त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची आमची पूर्ण तयारी आहे. जो 'वंदे मातरम' न म्हणण्याची हिंमत करेल, त्याची पुढची सकाळ पाकिस्तानात होईल", असा इशाराही राणे यांनी दिला. (Nitesh Rane)



...तर थेट मोक्का लागणार : 


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन आदेशाचा संदर्भ देत राणे म्हणाले, "आमच्या सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची गोहत्या किंवा बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्यास थेट 'मोक्का' लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत. या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी सरकार करणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणाऱ्या या हिंदुराष्ट्रात कुणी नियम मोडले किंवा शरिया कायदा आणण्याचा प्रयत्न केला, तर ते थेट जेलची हवा खाताना दिसतील आणि त्यांची पुढची बकरी ईद तुरुंगातच जाईल," असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. (Nitesh Rane)

Comments
Add Comment

Maratha Reservation : आरक्षण तिढा हे सगळं शरद पवारांचे पाप - विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस होता. त्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका; जॉन्टी ऱ्होड्सचा बीसीसीआयला मोलाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि धडाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या भविष्याबाबत आ

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता केंद्रीय अन्वेषण

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका