French Open 2026 : भारतीय वंशाच्या निशेष बसवरेड्डीला वाइल्ड कार्ड, वावरिंका-मॉनफिल्सलाही थेट प्रवेश, अखेरची स्पर्धा खेळण्यास सज्ज...

फ्रेंच ओपन 2026 स्पर्धेसाठी भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू निशेष बसवरेड्डी याला वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. आयोजकांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. फ्रेंच ओपेन 2026 २४ मे पासून सुरु झाली आहे. निशेष बसवरेड्डीसोबत तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेता स्टॅन वावरिंका आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू गेल मॉनफिल्स यांनाही थेट मुख्य फेरीत स्थान देण्यात आले आहे. वावरिंका आणि मॉनफिल्स हे दोघेही आपल्या करियरच्या अखेरच्या टप्प्यात आहे, हा त्यांचा शेवटचा फ्रेंच ओपन ठरण्याची शक्यता मानली जात आहे. ४१ वर्षीय वावरिंक आणि ३९ वर्षीय मॉनफिल्स या दोंघेही या स्पर्धेनंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेऊ शकतात.
वावरिंकाने 2015 मध्ये नोव्हाक जोकोविचला अंतिम फेरीत हरवले होते.स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाने 2015 मध्ये रोलाँ गॅरोचे (French Open) विजेतेपद पटकावले होते. सध्या तो एटीपी क्रमवारीत (ATP Rankings) ही पुरुषांच्या व्यावसायिक टेनिस (Professional Tennis) खेळाडूंची जागतिक पातळीवरील गुणवत्तेनुसार लावलेली क्रमवारी आहे.) 125 व्या स्थानावर आहे. तर गेल मॉनफिल्सने 2008 मध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. आयोजकांकडून या दोन्ही दिग्गजांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
फ्रान्सचे गेल मॉनफिल्स 2008 मध्ये पॅरिसमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले होते.

21 वर्षीय निशेष बसवरेड्डीचे पालक मूळचे आंध्र प्रदेशातील नेल्लोरचा आहे. त्याचे वडील मुरलीकृष्ण बसवरेड्डी आणि आई साई प्रसन्ना 1999 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले होते. निशेषने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले होते.

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव