मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठीचे धिंडवडे!

मुंबई : राज्यातील परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी आणि ‘उबर’ चालकांना मराठी लिहिता-वाचता आले पाहिजे, यासाठी आग्रह धरला जात असताना, दुसरीकडे ज्या मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, त्याच मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठी भाषेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मंत्रालयाच्या 'गार्डन गेट'वर लावण्यात आलेल्या एका सूचनाफलकावर धड एक वाक्यही व्याकरणदृष्ट्या शुद्ध लिहिता आलेले नाही. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.मागील अनेक दिवसांपासून हा अर्थहीन आणि अशुद्ध सूचनाफलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर दिमाखात झळकत असून, राज्याला दिशा दाखवणाऱ्या मराठी भाषा विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यासाठी 'गार्डन गेट'च्या बाहेर एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर “मंत्रालय प्रवेश करीता ०२.०० वाजल्यांचे रांग येथुन चालु” असे अत्यंत चुकीचे आणि व्याकरणशून्य वाक्य लिहिण्यात आले आहे.



मराठी भाषेच्या नियमांनुसार हे वाक्य जर शुद्ध स्वरूपात लिहायचे झाले, तर ते ‘मंत्रालयात प्रवेशाकरिता दुपारी २ वाजल्यापासून येथून रांग लावावी’ असे असायला हवे होते. मात्र, या फलकावरील वाक्यात शब्दांची आणि व्याकरणाची अशी काही मोडतोड करण्यात आली आहे की, त्याचा धड अर्थ लावणेही कठीण झाले आहे.

मराठी भाषाप्रेमींचे 'सौजन्य' हरवले?
 राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो नागरिक विविध कामांनिमित्त मंत्रालयात येत असतात. हा फलक वाचून वाक्य चुकीचे असले तरी, नागरिक त्यातून कसातरी स्वतःचा अर्थ काढतात आणि रांगेत उभे राहतात. मात्र, मंत्रालयात ये-जा करणाऱ्या मराठी भाषा विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी किंवा स्वतःला 'मराठी भाषाप्रेमी' म्हणवून घेणाऱ्या एकाही कथित नेत्याला हा अशुद्ध फलक बदलण्याचे सौजन्य दाखवावेसे वाटले नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच राज्याच्या मातृभाषेची अशी दुरवस्था होत असेल, तर सर्वसामान्यांनी आणि परप्रांतीयांनी मराठीचा आदर कसा करावा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा वादग्रस्त आणि चुकीचा फलक तातडीने बदलून तिथे प्रमाण मराठीतील फलक लावला जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

वैद्यकीय तज्ज्ञांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले आरोग्याचे धडे, ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमाला तरूण- तरूणींचा उत्सफुर्त प्रतिसाद

मुंबई: बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढता वापर, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण या वेगवेगळ्या

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले