RCB VS GT Qualifier-1 : पावसाचं संकट, पण फायनलचं स्वप्न कायम! आज आरसीबीविरुद्ध गुजरातमध्ये महा मुकाबला...

IPL 2026 PLAYOFF : आयपीएल 2026 च्या क्वालिफायर-1 मध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. धर्मशाळातील एचपीसीए स्टेडियमवर होणारा हा सामना थेट अंतिम फेरीचं तिकीट ठरवणार आहे. मात्र, या हायव्होल्टेज लढतीवर पावसाचं सावट आहे. हवामाम विभागाकडून 80 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रद्ध झाला तर आरसीबीला थेट फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०११ प्लेऑफ पासून क्वालिफयर आणि एलिमिणटरची पद्धत सुरू झाली होती . त्यनंतर क्वालिफायर-1 जिंकणाऱ्या 15 पैकी 12 संघांनी आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे


हेड टू हेडमध्ये काट्याची टक्कर


आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि गुजरात यांच्यात 8 सामने खेळले गेले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामने जिंकले आहेत. या हंगामातही दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे क्वालिफायरमध्ये कोण बाजी मारणार याकडे सपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.



पावसामुळे RCB ला थेट फायदा?


आयपीएल २०२६ चा क्वालिफयर सामना धर्मशाळा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. धर्मशाळातील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनूकूळ मानली जाते. यंदा येथे झालेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. आरसीबी सध्या १४ पैकी ९ सामने जिंकत. १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यामुळे या नियामाचा थेट फायदा आरसीबीला होईल.


विराटवर आरसीबीची मोठी जबाबदारी


कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने यंदा आक्रमक क्रिकेट खेळत तब्बल 8 वेळा 200 धावांचा टप्पा पार केला आहे. यात विराट कोहली संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १४ सामन्यात 557 धावा केल्या आहेत. या निर्णायक सामन्यात देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि फिल सॉल्ट यांच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवुड ही जोडी आरसीबीची ताकद ठरली आहे.



गुजरातची ताकद वेगवान गोलंदाजी ?


गुजरात टायटन्सने यंदा दमदार गोलंदाजीच्या जोरावर प्लेऑफ गाठलं आहे. या हंगामात ही कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या तिकडी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कगिसो रबाडाने 24 विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे.गुजरात टायटन्सची फलंदाजी त्यांच्या टॉ-३ फलंदाजांवर जास्त अवलंबून आहे. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. सुदर्शनने 638 धावा करत ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. तर कर्णधार शुभमन गिलने ६१६ धावा केल्या आहेत.



संभाव्य प्लेइंग-11


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेविड, वेंकटेश अय्यर, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, रसिक सलाम.


गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशिद खान, निशांत सिंधू, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या