USA : अमेरिका माघार घेणार, US नेव्ही इराणपासून दूर जाणार; होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी संपुष्टात येणार ?

वॉशिंग्टन डीसी : इराणला बेचिराख करण्याची आणि त्यांची संस्कृती संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेने माघारीचे संकेत दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस नेव्ही अर्थात अमेरिकेचे नौदल इराणपासून दूर नेण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. युद्ध थांबवण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी संपुष्टात आणून तणाव दूर करण्यासाठी अमेरिका इराणपासून दूर जाण्याची तयारी करत आहे. अमेरिकेच्या नौदलाने माघार घेतली तर महिन्याभरात होर्मुझमार्गे आधी होत होती त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात जलवाहतूक होऊ शकेल, असा विश्वास इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने व्यक्त केला आहे.



अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीसाठी पुढील दोन महिन्यांत अंतिम करार झाला तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून त्याला बंधनकारक ठराव म्हणून मंजुरी दिली जाईल. सामंजस्य करारानुसार, अमेरिकन सैन्य इराणच्या परिसरातून माघार घेईल आणि नौदल नाकेबंदी उठवली जाईल. या बदल्यात, इराणने एका महिन्याच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांची संख्या युद्धापूर्वीच्या पातळीवर आणण्याचे वचन दिले आहे.



अमेरिका - इराण सामंजस्य करारातील महत्त्वाचे मुद्दे




  1. अमेरिकेचे सैन्य इराणच्या आसपासच्या भागातून माघार घेईल आणि नौदल नाकेबंदी उठवेल

  2. इराण एका महिन्याच्या आत सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी वाहतूक युद्धापूर्वीच्या पातळीवर पूर्ववत आणेल

  3. करारात लष्करी जहाजांच समावेश नाही

  4. इराण ओमानसोबत संयुक्तपणे सामुद्रधुनीतील वाहतुकीचे व्यवस्थापन करेल


अमेरिका - इराण युद्ध


अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराणवर हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्यांनीच पश्चिम आशियात नव्या युद्धाला तोंड फुटले. इराणने इस्रायलवर तसेच अमेरिकेच्या आखाती देशांतील तळांवर हवाई हल्ले सुरू केले. एकमेकांचे सामर्थ्य नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले. युद्धाला तोंड फुटताच होर्मुझ सामुद्रधुनीतील जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला. ही संधी साधत इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे त्याच्या मर्जीशिवाय जलवाहतूक होणार नाही, असे जाहीर केले. याचा प्रतिकूल परिणाम जागतिक पातळीवर झाला. अनेक देशांमध्ये महागाई उसळली. युद्ध लांबू लागले तसे अनेक देशांतील नागरिकांसाठी जगणे कठीण होऊ लागले. इंधन पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला. युद्धादरम्यान एकमेकांचे खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या महत्त्वाच्या तेलसाठ्यांवर तसेच तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हवाई हल्ले झाले. यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला. पण युद्ध थांबण्याची शक्यता वाढल्यामुळे पुढील काही दिवसांत जागतिक पातळीवरचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

PoK Protest : दडपशाहीविरोधात PoK पेटणार? जनआंदोलनामुळे पाकिस्तानची चिंता वाढली

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओजेके) परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. वाढत्या महागाई,

Orangutan rescue Odisha : ओडिशातून तस्करीत सापडलेली ५ ओरंगउटान पिल्ले लवकरच परतणार मायदेशी!

चेन्नई : इंडोनेशियाच्या (Indonesia) जंगलांतून बेकायदेशीरपणे तस्करी करून भारतात आणलेली पाच गोंडस ओरंगउटानची (Orangutans)

Russia Ukraine War : पुतिन जिंकले, ट्रम्प हरले? रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचा सर्वात मोठा युटर्न

वॉशिंग्टन: चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

France Protest : आंदोलनाच्या आगीत ऐतिहासिक वास्तू भस्मसात; फ्रेंच नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख

 France Protest :  फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार

Colombia Mining Accident: सोन्याच्या हव्यासातून भीषण दुर्घटना? कोलंबियात खाण कोसळली; 14 जणांचा मृत्यू

बोगोटा : नारिन्यो भागात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा अवैध खाणकामांचा धोका आणि तिथल्या भीषण वास्तवावर

रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा; पुतिन यांचा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यासोबत त्रिपक्षीय शिखर परिषदेचा प्रस्ताव

वॉशिंग्टन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पुढील महिन्यात