Asaram Bapu :आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका

Asaram Bapu : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आसाराम बापू याला हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. आसाराम बापू याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा राजस्थान हायकोर्टाने कायम ठेवली आहे. आसाराम बापूचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावलय. मात्र त्‍याला अंशतः दिलासा देत सामूहिक बलात्कार (गँगरेप) आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.


नेमकं प्रकरण काय ?


२०१३ मध्‍ये हे प्रकरण समोर आले. जोधपूर येथील आश्रमात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप झाले. तपासाअंती पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये विशेष पोक्सो न्यायालयाने आसारामला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत (उर्वरित आयुष्यासाठी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकाला विरोधात आसारामने उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.



राजस्‍थान उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती अरुण कुमार मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठासमोर आसारामच्‍या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची आसारामची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिका फेटाळताना खंडपीठाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC) बलात्काराचा आरोप, पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा आरोप आणि बाल न्याय (जेजे) कायद्यांतर्गत असलेले गुन्हे सिद्ध झाले आहेत.


सामूहिक बलात्कार आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित आरोप कायम ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील पुरावे पुरेसे नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासोबतच, उच्च न्यायालयाने आसारामचे २ सहकारी यांना दिलासा दिला आहे. शरदचंद्र आणि शिल्पी यांची या सर्व आरोपातून मुक्तता केली आहे. यापूर्वी विशेष न्यायालयाने या दोघांनाही २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.


ऑक्टोबर २०२५ पासून आसाराम वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर बाहेर आहे. त्यापूर्वी, मार्च २०२४ मध्ये उपचारासाठी पहिल्यांदा अल्पमुदतीचा दिलासा मिळाल्यानंतर त्याला अनेक वेळा तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या अंतरिम जामिनाची मुदत ७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि