Iran - America War : युद्ध पुन्हा भडकणार! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा पलटवार; अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

- कुवेतमध्ये हाय अलर्ट


अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव (Iran - America War) पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून, मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच अमेरिकेने इराणमधील अब्बास पोर्ट परिसरात केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Iran - America War)



संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित :


इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू झाल्यानंतर कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीचे निवेदन जारी केले. त्यानुसार, कुवेतच्या हवाई क्षेत्राच्या दिशेने येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. (Iran - America War)


इराणची वृत्तसंस्था ‘तसनीम’च्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.५० वाजता अब्बास पोर्ट परिसरात अमेरिकेने हवाई हल्ले केले. त्यानंतर लगेचच IRGC ने प्रत्युत्तरादाखल अमेरिकन लष्करी तळांवर कारवाई सुरू केली. मात्र, कोणत्या तळांना लक्ष्य करण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. (Iran - America War)



IRGC चा अमेरिकेला थेट इशारा :


दरम्यान, IRGC ने अमेरिकेला थेट इशारा देत म्हटले आहे की, “इराणवर पुन्हा हल्ले झाले तर त्याला निर्णायक आणि अधिक तीव्र उत्तर दिले जाईल. त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.” या संघर्षाचे पडसाद आता शेजारील देशांमध्येही उमटू लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Iran - America War)


रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनीही इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर रात्रीभर कारवाया सुरू असल्याचे मान्य केले आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिकन नौदल आणि व्यापारी जहाजांसाठी धोका ठरणाऱ्या इराणी तळांवर लक्ष्य साधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Iran - America War)



या वाढत्या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले सुरू केले होते. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले. यामध्ये इस्रायल, यूएई आणि कुवेतसह अनेक देशांवर हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. (Iran - America War)


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत करार होण्याचे दावे केले होते. मात्र, युरेनियम संवर्धनाच्या मुद्द्यावर इराण झुकण्यास तयार नसल्याने चर्चा निष्फळ ठरत आहेत. आता हा संघर्ष आणखी चिघळणार की दोन्ही देश शांततेचा मार्ग स्वीकारणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (Iran - America War)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे